व्हॉटसअपची मैत्री पोहोचली एमएमसपर्यंत आणि मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020
  • आजकाल व्हॉटसअप हे माध्यम प्रत्येकाला सोयीसकर वाटते.
  • तसेच व्हॉटसअप हे सगळ्यांना सुरक्षित सोशल माध्यम वाटते.
  • व्हॉटसअप हे प्रत्येकाच्या सोयीचे साधन झाले आहे.

ऊना :- आजकाल व्हॉटसअप हे माध्यम प्रत्येकाला सोयीसकर वाटते. तसेच व्हॉटसअप हे सगळ्यांना सुरक्षित सोशल माध्यम वाटते. व्हॉटसअप हे प्रत्येकाच्या सोयीचे साधन झाले आहे. परंतु यात देखील अनेक गुन्ह्यांच्या घटनाही समोर आल्या आहेत. गुन्हाचा असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअपवरून झालेल्या मैत्रीची तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली. पीडित तरुणीने युवकाविरूद्ध महिला पोलीस ठाणे उना इथे तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

हॉटेलमध्ये घेऊन गेल्याचा आरोप

हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. २६ वर्षीय पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये जिल्हा चंबा इथल्या एका युवकाने व्हॉट्सअ‍ॅपवरुन मैत्री केली. त्या युवकाशी रोज बोलणे होत होते. परंतू, तो तरुण मला भेटायला उना इथे आला आणि मला हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या युवकाने हॉटेलमध्ये माझा अश्लील फोटो काढला. एवढेच नाही तर माझ्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले.

अश्लील फोटोवरून सुरू केली ब्लॅकमेलिंग

फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने या तरुणाने पीडितेला वारंवार भेटायला बोलावले. भीतीने घाबरुन ती त्याला धर्मशाला, चंदीगड आणि अमृतसर इथे भेटायला गेली. पीडित तरुणीचे म्हणणे आहे की, आरोपी तरुणाने तिच्या चारित्र्यावर बोट ठेवत तिचा विवाहदेखील मोडला. ७ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या फेसबुक आयडीववरून अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

 

आरोपी तरुणाने पीडितेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यासंबंधी पीडितेने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संपूर्ण घटना लक्षात गेता पीडितेच्या सांगण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News