महिला कशीही असो, तिला डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही - ठाकरे

यिनबझ टीम
Thursday, 5 March 2020

आपला देश स्वतंत्र आहे आणि या देशात कुठलीही महिला कितीही वर्षांची असो, रात्री कितीही वाजता बाहेर गेलेली असो, कशाप्रकारचेही कपडे घातलेले असो, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल; पण कोणालाही तिला हात लावायचा, डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही!

मुंबई - आपला देश स्वतंत्र आहे आणि या देशात कुठलीही महिला कितीही वर्षांची असो, रात्री कितीही वाजता बाहेर गेलेली असो, कशाप्रकारचेही कपडे घातलेले असो, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल; पण कोणालाही तिला हात लावायचा, डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही! अशा खरमरीत शब्दात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला सुरक्षेवर वक्तव्य केलं आहे.

महिला दिनानिमित्त विधानसभेत सुरु असलेल्या विशेष चर्चेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी महिलांवर होत असलेल्या आत्याचारावर आपलं परखड मत व्यक्त केले आहे. महिलांवर होत असलेल्या आत्याचाराबद्दल महिलांनी आवाज उठवण्याआधी त्यावर पुरुषांनी आवाज उठवणे गरजेचे आहे, त्याशिवाय कोणतेही बदल होणार नाहीत, असे मत आदित्या ठाकरे यांनी व्यक्त केले.

महिला सबलीकरण या महत्वाच्या मुद्दावर चर्चा होत असताना सर्व पक्षीय नेत्यांनी आपली मते सादर केली. प्रत्येक महिला समरोच्या महिलेबद्दल काळजीने, आदराने बोलते मात्र पुरुष समोरच्या महिलेबद्दल आदराने बोलेलच असे सांगता येत नाही, महिलांच्या सबलीकरणावर, त्यांच्या सुरक्षिततेवर दर तीन महिन्यांनी विधीमंडळात चर्चा व्हावी, अशी मागणीदेखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News