मी जे काही आहे, ते यिनमुळ... आजी-माजी मंत्र्यांनी केल्या भावना व्यक्त...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • यिनच्या  वर्धापनदिना निमित्त,   यिनच्या आजी-माजी मंत्री यांच्यासोबत मुक्त संवाद...

मुंबई : मी  एक लाजरा बुजरा विद्यार्थी होतो, मला ना बोलायचं होतं, ना कुठल्या उपक्रमात सहभागी होण्याचे धाडस माझ्यात होत. मी यिनमध्ये आलो आणि माझा चेहरामोहरा बदलला. 2014 पासून यिनमध्ये मी सक्रिय आहे आणि शेवटपर्यंत राहणार नाही. आज यिन'चा वर्धापन दिन आहे. माझ्या आयुष्याची खरी सुरुवात याच दिवसापासून झाली होती. हा दिवस मी कधीही विसरणार नाही. जर यिनची  सुरुवात झाली नसती, तर मी आज तुमच्या पुढे बोलता दिसलो नसतो. मी सदस्य झालो ,अध्यक्ष झालो, मी मंत्री झालो. आयुष्यात आणखीन मला काही काही करायचे  आहे. हे  यीनमुळे शक्य झालं. असे अनेक अशा अनेक विषय घेऊन आज यिनचे आजी-माजी मंत्री वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलते झाले, त्यांनी मुक्त संवाद साधला, कोणी समाजकारणात आहे, कोणी राजकारणामध्ये आहे, कोणी अजून शिकत आहे.सगळ्यांना आजही गरज आहे यिनच्या पाठबळाची. त्यातील काही निवडक व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया, संवाद रूपाने खालीलप्रमाणे देत आहोत.

सकाळ माध्यम सुमहाचे सीईओ अभिजित पवार सरांनी उपलब्ध करून दिलेल्या यिनच्या व्यासपीठातून मी खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याला सुरुवात केली. यिनमुळे माझ्या नेतृत्व गुणांना वाव मिळाला. यिनच्या माध्यमातून मी आरोग्य खात्याचा राज्यमंत्री झालो. मी मेडिकलचा विद्यार्थी असल्यामुळे एका वर्षात तब्बल 20 आरोग्य व दंतरोग शिबीरे घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने सिंदखेडराजा, महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथे 101 वृक्षाचे वृक्षारोपन करून आजतागायत त्यांचे संगोपन करत आहे. माझ्यामधील नेतृव गुणांना खऱ्या अर्थाने यिनमध्ये चालना मिळाली. येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील अनेक युवकांपर्यंत हे व्यासपीठ पोहचेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला अभिमान आहे, कमी वयात चांगल्या प्रकारे मी सामाजिक काम केले, त्यांची दखल घेऊन तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. त्यामध्ये राज्यस्तरीय जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते यशवंतरत्न पुरस्कार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय सोशल मीडिया महामित्र, आणि राज्यस्तरीय युथ आयडाँल पुरस्कारासाठी निवड झाली आहे, याचे सर्व श्रेय मी अभिजित पवार सरांना देतो.  
- डॉ पंकज भिवटे, माजी आरोग्यराज्यमंत्री यिन 

आज सकाळ माध्यम समूहाने कॉलेजवयीन युवकांना लोकशाही कळावी, त्यांच्यातील नेतृत्वगुणाचा विकास व्हावा, यासाठी 'यिन' अर्थात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची स्थापना करून आम्हा युवकांना लोकशाहीचे दर्शन घडवून आणले परंतु, महाराष्ट्राच्या शॅडो कॅबिनेटमध्ये एक कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी देऊन एक मंत्री असण्याचा अनुभव निर्माण केला. मंत्र्यांचे काम काय असते? विधानभवन, विधानपरिषदेचे कामकाज जवळून पाहण्याचा अनुभव घेता आला. आज यिनमुळे आम्ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू शकलो. अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजातील युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या अन्यायावर वेळोवेळी आवाज उठवून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. अद्याप करत आहोत याची सर्वस्वी श्रेय सकाळ माध्यम समूहाला व 'यिन'ला आहे. 'यिन'च्या सहाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा...
- श्रीकांत जाधव, 'यिन'दुग्धविकासमंत्री यिन

मी सुरुवातीला स्टेज आणि माईकला फार भित होतो. पहिली ते १०वी पर्यंत प्राथमिक शाळेत माईक, स्टेजवर कधी गेलो नाही पण १० वी नंतर कॉलेज मध्ये गेलो. ११ वी च्या शेवटच्या वर्षात मला यिनची माहिती मिळाली आणि २०१६ मध्ये सर्वात प्रथम कमी वयात यिनचा प्रतिनिधी बनलो, त्यानंतर २०१७ मध्ये कॉलेज अध्यक्ष ते यिन जिल्हा अध्यक्षचा प्रवास केला. यामध्ये अनेक मित्र मिळत गेले. त्या वर्षी सर्वात प्रथम वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री असण्याचा मान मिळाला. जिल्ह्यामध्ये बरेच काम केली, विद्यार्थ्यांनासाठी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१८ मध्ये वनमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एका सर्व साधारण कुटुंबातील मुलाला महाराष्ट्रभर ओळख मिळाली. मी स्वतःची संस्था स्थापन करून त्याच्या अंतर्गत विविध काम करतोय. याच सर्व श्रेय हे फक्त यिनला आहे. नेता, अभिनेत्यांना भेटण्याचा विचार स्वप्नात देखील केला नव्हता, त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं. त्यांच्याशी चर्चा करता आली. हे माझ्यासाठी फार महत्वाचे होते. तेजस गुजराती, संदीप काळे, बाळू काळे, मीनाक्षी रामटेके यांचे फार मोठे योगदान आहे.
- मोहित सतीश सहारे, कॅबिनेट वनमंत्री, यिन

यिनमध्ये मी आलो ते मुळातच योगायोगाने. यिनने मला पुण्याचा जिल्हाध्यक्ष केलं. पुण्यातील सर्व कॉलेजमध्ये माझी वेगळी ओळख निर्माण करून दिली. आज पुण्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये कोणी ना कोणी ओळखीचं भेटतं, त्याचे श्रेय यिनला जाते. यिनने मला राज्याचे शिक्षणमंत्री केले. त्यानंतर एक वेगळेच विश्व अनुभवायला मिळाले. आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या मंत्री महोदयांना भेटण्याची संधी मिळाली. अनेक मंत्री महोदयांना सोबत घेऊन काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील कित्येक राज्यात ओळख निर्माण झाली. याचे श्रेय पण यिनला जाते. आयुष्यात पुढे जात असताना प्रत्यक्ष आम्ही यिनमध्ये नसलो, तरी आमच्यात यिन कायम राहील. धन्यवाद! दिलेल्या प्रेमासाठी..
- योगेश जाधव, माजी शिक्षणमंत्री. यिन

यिनची कारकीर्द माझ्यासाठी आयुष्यभर सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असुनही यिनच्या व्यासपीठामुळे आव्हानात्मक, विधायक अशी कामे करण्याची संधी मिळाली. यिनच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री पदाची जबाबदारी माझ्यासाठी आव्हान होते, परंतु अभिजीत पवार, संदीप काळे यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळाले. गृहमंत्री म्हणून राज्यातील तरुणांना घेऊन अनेक पोलीस स्टेशनची पाहणी, पोलीस मित्र, ग्रामसुरक्षादल, मतदान जागृती असे अनेक उपक्रम राबविले, तसेच शासन प्रशासन आणि नागरिक यांच्या मधील दुवा बनून काम करता आले. आजच्या सामाजिक क्षेत्रातील वाटचालीत यिनचे प्रचंड योगदान आहे.
- विवेक पवार पाटील, माजी गृहमंत्री, यिन

आयुष्यात कॉलेज जीवनापासून नेतृत्व करण्याची सुरुवात कुठून झाली असे विचारल्यावर पहले नाव येते ते म्हणजे यिन, गेल्या 4 वर्षांपासून मी यिनसोबत आहे. आणि शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये पालकमंत्री म्हणून माझी वर्णी लागली. जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी नव्याने काम उभं केलं वर्षभर नवनवीन सामाजिक उपक्रम राबिवले. ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले. समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी लढण्याची माझ्यात ताकत निर्माण झाली. त्यानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीमध्ये युवक जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. विद्यार्थ्यांनच्या हिताचा विचार करत छात्रभारती विद्यार्थी संघटना धुळे जिल्हाध्यक्ष पदावर मी कार्यरत आहे. यिनमुळे आज महाराष्ट्रभर ओळखी निर्माण झाली. यिनने दिलेल्या व्यासपीठामुळे माझ्या आयुष्याची खरी सुरुवात झाली. आज यिनच्या 6 व्या वर्धापन दिन साजरा करतांना अतिशय आंनद होत आहे. महाराष्ट्रातील यीनर्सला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
- प्रकाश शरद पाटील, पालकमंत्री, धुळे.

यिनच्या मंत्रिमंडळात औरंगाबादचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर खुप मोठी जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी वेगळा अनुभव देणारी होती. औरंगाबादचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यात माणुसकीची भिंत, मतदान जागृती, गरिबांना कपडे वाटप, चला गावाकडे असे विविध उपक्रम राबविले. शासन आणि प्रशासन यांच्या कामाची पद्धत अगदी जवळून अनुभवता आली. अनेक नवीन गुण अंगीकारता आले. वक्तृत्व, नेतृत्व यांची सांगड घालून कर्तृत्व कसे घडवावे हे यिनमुळे शिकता आले. समर युथ समिटमुळे अनेक मान्यवर लोकांना भेटून प्रत्यक्ष संवाद साधता आला. आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जी वाटचाल चालू आहे त्यात यिनच्या  मोठा वाटा आहे.
- सादिक शेख, माजी पालकमंत्री, औरंगाबाद

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News