तुम्ही कशाला प्राधान्य द्याल..नोकरी की व्यवसाय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 August 2020

तुम्ही कशाला प्राधान्य द्याल..नोकरी की व्यवसाय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

तुम्ही कशाला प्राधान्य द्याल..नोकरी की व्यवसाय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

जगावरती आलेलं महामारीचं संकट केव्हा सरेल हे निश्चित कोणीचं सांगू शकत नाही. अशातचं अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत, तर काही उद्योजकांचे उद्योग बंद झाले आहेत. कोरोनापुर्वीचं आयुष्य केव्हा सुरू होईल व ते सुरू होईल की नाही हे सुध्दा कोणीचं सांगू शकत नाही. नोकरी की व्यवसाय...नॊकरी तर का ? व्यवसाय तर का ?... या विषयावर आज 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

तुम्ही जर, एका सर्वसामान्य घरात जन्म घेतला असाल, ज्याच्या घरी महिन्याच्या शेवटी पगार येऊन दैनंदिनि सुरळीत चालते. तेव्हा कालांतराने घरची मानसिकता ही मोठ्या पगाराच्या नोकरीच्या दिशेने झुकताना पाहायला मिळते. आणि हेच पालकांच्या अपेक्षांच ओझं मुलांच्या खांद्यावर येतं. त्यामुळे बहुतेक मुलं नोकरीच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात...

पण जो योग्य शिक्षित तरुण वर्ग आहे, त्याची मानसिकता कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा, कोणाला तरी सोबत घेऊन काम करण्याची असते. मात्र अपुरं भांडवल त्याचबरोबर व्यवसाय सुरू करण्याची जाचक प्रक्रिया यामधे अडथळा निर्माण करते.. एक तरुण म्हणून, मला व्यवसाय करायला आवडेल.

- विनायक पाटील

माझ्या मते नोकरी आणि व्यवसायपेक्षा, स्वयंरोजगार आणि व्यवसाय हा विषय योग्य राहिलं. प्रथमतः आपण नोकरी बद्दल बोललो तर आपल्याकडे दरवर्षी पदवीधर विद्यार्थी आणि बेरोजगारी ह्या दोन्ही आकड्यांचा कुठेच तालमेळ नाही. ही तफावत कोणी एका सरकार कडून कमी करता येणे शक्य नाही. काही विभाग पाहिले तर त्या ठिकाणी शैक्षणिक पदवीची गरज नाही. त्याठिकाणी स्थानिक तरुणांची सर सकट भरती करता येऊ शकते. उर्वरित ज्या नोकऱ्या आहेत तिथे जागा आणि नोकरीचे अर्ज पाहता ही तफावत किती मोठी आहे हे समजेल.

नोकरदार वर्ग पाहता सरकारी कंपन्यांचं पण खासगीकरण सुरु आहे. तिथेही कंत्राट दारीने नोकऱ्या सुरु केल्या आहेत. कोरोना काळात,आर्थिक मंदीमध्ये खूप लोकांच्या पगारात कपात तर काही कंपण्यामध्ये नोकरकपात करण्यात आली. नोकरी ही मध्यमवर्गीय लोकांना दैनंदिन जीवन चालवण्यासाठी एक मार्ग आहे. त्यामध्ये होणारी प्रगती ह्यावर मात्र प्रत्येक जण समाधानी नसतो.

स्वयंरोजगार हा नोकरी आणि व्यवसाय ह्या मधला दुवा बोलू शकतो, ह्यामध्ये तुमच्याकडे कौशल्यता, चिकाटी, मेहनत हवी. स्वयंरोजगारासाठी लागणार भांडवल हे त्या तरुणाला त्याच्या विभागानुसार माहिती असते. कारण त्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं असते. त्यामुळे दैनंदिन जीवनाचा खर्च हे तरुण सहज काढू शकतात. हळूहळू जम बसेल तसं 2-3 व्यक्ती अजून तुमच्यासोबत जोडत तुम्ही ह्याचा विस्तार करू शकतात.

आता हा विस्तार करत तुम्ही पूर्णपणें व्यवसाय क्षेत्रात उतरू शकतात आणि आपल्याकडे योग्य प्रकल्प, माहिती, ज्ञान, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ असल्यावर व्यवसायासाठी लागणारे भांडवल उपलब्ध करता येऊ शकते.

माझ्या मते स्वयंरोजगार उत्तम पर्याय आहे.

कारण स्वयंरोजगार साठी तुम्हाला अनुभव हवा, जो नोकरी करून किंवा जाणकार व्यक्ती कडून घेऊन तुम्ही स्वतंत्रतः रोजगार करू शकता आणि नंतर त्याच रूपांतर व्यवसाय मध्ये करता येईल.

- नितेश कांबळे (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स)

व्यवसाय किव्हा नोकरी यातून काही निवडाव लागलं तर मी व्यवसाय याची निवड करेल कारण व्यवसाय केल्याने बहुतेक स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या गरजा पूर्ण करता येतात. मनात सर्वांच भल करायचं अशी इच्छा असून चालत नाहीत. त्याला खिशात अर्थ (पैसा ) असायला हवा मगच आपल्या गरजा परिवाराच्या गरजा आणि समाजाच्या गरजा पूर्ण करता येतात. एक उदाहरण रतन टाटा यांचं देता येईल की, अर्थ जवळ होता म्हणून समाजाकरीता काही करू शकले अशी अनेक उदाहरण देता येतील. म्हणून मी नोकरी आणि व्यवसायाची निवड करेल

- विजयकुमार कटारे

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. जो तो स्वता: च्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरीची धडपड करत आहेत.  कोणी ही व्यवसाय करण्याच्या मागे लागत नाहीत. मी निवडायला दोन्ही पण निवड करेल पण जर स्वत: च्या कल्पनेतून काम करण्यासाठी नक्कीच व्यवसाय हे क्षेत्र निवडले. पण जर स्वत: काम करून आनंद घ्यायचा असेलतर नोकरी क्षेत्र निवडीला घेईल.

- स्वाती शेषराव बडे (रूईया कॉलेज)

नोकरी किंवा व्यवसाय यापैकी मी व्यवसायाला प्राधान्य देईल. नोकरीमध्ये पगार हा सुरळीत असतो पण प्रगतीची संधी ही मर्यादित आहे. पण व्यवसायात प्रगतीसाठी भरपूर वाटा उपलब्ध आहे. नोकरी ही फक्त एका माणसापूर्ती मर्यादित असते. पण व्यवसाय हा आपल्यानंतर आपल्या परिवाराची ही प्रगती करू शकते.
 तसेही आजच्या काळात नोकरी मिळणं हे अवघड होऊन बसले आहे. 100 जर जागा असतील तर त्यासाठी 1000 अँप्लिकेशन येतात. यामुळे तरुणांनी नोकरीच्या पाठी लागण्यापेक्षा स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय करण्याकडे भर द्यावा.

- श्रध्दा कोकरे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News