परीक्षाबाबत कुलगुरूंच्या बैठकीत काय ठरलं यांचा निर्णय सोमवारी होणार..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020
  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भावमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या परंतु त्यावरून अनेक राजकीय वाद निर्माण झाले होते.
  • विद्यार्थी देखील व्दिध्दा मनस्थितीत होते की, परीक्षा होणारा आहे की नाही, आणि झाली तर ती कशी होणार असे अनेक प्रश्न विद्यार्थांच्या मनात पडत होते.

मुंबई :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भावमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या परंतु त्यावरून अनेक राजकीय वाद निर्माण झाले होते. विद्यार्थी देखील व्दिध्दा मनस्थितीत होते की, परीक्षा होणारा आहे की नाही, आणि झाली तर ती कशी होणार असे अनेक प्रश्न विद्यार्थांच्या मनात पडत होते. परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देऊ नये, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्य सरकारची सूत्र हलायला लागली आणि बैठकींचे सत्र सुरू झाले. परीक्षा घेण्यापासून ते निकाल लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सोमवारी दुपारपर्यंत येईल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेऊ शकतो का याचा निर्णय आता सोमवारवर गेला आहे.

शनिवार असूनही उच्च आणि तंत्रशिश्रण मंत्री उदय सामंत यांच्या दालनात अखंड बैठका सुरू होत्या. त्यात महत्त्वाची ठरली कुलगुरूंबरोबरची बैठक. दुपारी १ वाजता राज्यातल्या सर्व कुलगुरूंबरोबर सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. ती परीक्षेसंदर्भातला निर्णय घेईल.

या बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित कशा घेता येतील या संदर्भात महत्वाची चर्चा झाली. सोप्यातल्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यासंदर्भात उपाय सुचवले गेले. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेपूर्वी मिळाला पाहिजे, अशीही भूमिका मांडण्यात आली. कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. पण त्यांच्यावर परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी दबाव आणला जाणार आहे. त्यांची कुठलीही अडचण होणार नाही, याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितले.

'३० सप्टेंबर दुपारी १२  पर्यंत  आम्ही परीक्षा घेऊ शकतो का ?  याचा निर्णय येत्या सोमवारी परीक्षा समिती घेणार आहे. सोमवारी दुपारी १२  वाजेपर्यंत परीक्षा समितीचा अहवाल येणार आहे', असं सामंत म्हणाले.

यानंतर संध्याकाळी चार वाजता माजी कुलगुरू वेरुळकर, विजय घुले तसेच उच्च शिक्षण विभागातील दोन्ही संचालक यांच्या सोबतही बैठक घेणार आहेत.

कुलगुरूंसोबतच्या बैठकीत काय ठरले?

  • विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकणार नाही.
  • विद्यार्ध्यांना अडचण होणार नाही याचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
  • मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीसोबत दोन संचालक समन्वयाचे काम करेल.
  • विद्यार्थ्यांना सेंटरला बोलावून परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचे मत कुलगुरूंनी व्यक्त केले.
  • UGC ने सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन किंवा ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात चाचपणी.
  • १५ सप्टेंबरपर्यंत परीक्षाच घेऊ शकत नाही, असे गडचिरोली आणि चंद्रपूर मधल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले.
  • विध्यार्थ्यांना केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये अशीच पद्धती अवलंबावी असा आमचा प्रयत्न आहे.
  • आमच्या बोलण्याचा विपर्यास कोणी करू नये, राजकारण होऊ नये. यामुळे विध्यार्थ्यां मधला संभ्रम वाढेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News