लग्न म्हणजे काय असते?

चारूशीला भामरे, अंबरनाथ
Monday, 13 May 2019

लग्न म्हणजे काय असते?
त्याग, प्रेम अन् विचारांचे मीलन असते
वादळांत भरकटले थोडे कोणी
तरी हात घट्ट धरुन हाती, किनारा गाठणे असते!

लग्न म्हणजे काय असते?
सुख आणि दुःखाचे परफेक्ट कॉम्बिनेशन असते,
आपापल्याच चवीप्रमाणे काही ॲड करत गेल्यावर मात्र, दुसऱ्यासाठी ते फक्त ॲडजस्टमेंट असते!

लग्न म्हणजे काय असते?
एकमेकांच्या गुण - दोषांची स्वीकृती असते
संसारासाठी समर्पण करता करता कधी,
माळला तीने गजरा जरी, सुगंधित त्यानेच होणे असते!

लग्न म्हणजे काय असते?
त्याग, प्रेम अन् विचारांचे मीलन असते
वादळांत भरकटले थोडे कोणी
तरी हात घट्ट धरुन हाती, किनारा गाठणे असते!

लग्न म्हणजे काय असते?
तुझं माझं विसरून सारं...
ह्रदयाच्या झडपेसारखं सतत...
एकानं बंद, तर दुसर्याने लगेचच उघडायचं असते!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News