पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदी काय करत होते?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 February 2020

14 फेब्रुवारी पुलवामा हल्ल्याचा दिवस. आरडीएक्सनं भरलेले वाहन सैन्याच्या जवानांच्या ताफ्यातीव ट्रकला धडकते अन् होत्यचं नव्हतं होतं. त्यात सीआरपीएफच्या 40 जवानांचा मृत्यू होतो.परंतु इतरही काही गोष्टी आहेत. त्यात एक प्रश्न असा आहे की ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठे होते? या दिवशी नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये होते, हे एक मोठे आणि सडेतोड उत्तर आहे. पण बर्‍याच ठिकाणी बातम्या दिसू लागल्या. सुत्रांच्या म्हणण्यानुसार दर एक मिनिटांनी मोदींचे तपशील समोर आले.

14 फेब्रुवारी पुलवामा हल्ल्याचा दिवस. आरडीएक्सनं भरलेले वाहन सैन्याच्या जवानांच्या ताफ्यातीव ट्रकला धडकते अन् होत्यचं नव्हतं होतं. त्यात सीआरपीएफच्या 40 जवानांचा मृत्यू होतो.परंतु इतरही काही गोष्टी आहेत. त्यात एक प्रश्न असा आहे की ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठे होते? या दिवशी नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये होते, हे एक मोठे आणि सडेतोड उत्तर आहे. पण बर्‍याच ठिकाणी बातम्या दिसू लागल्या. सुत्रांच्या म्हणण्यानुसार दर एक मिनिटांनी मोदींचे तपशील समोर आले.

एनडीटीव्हीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता दिल्लीहून हवाईमार्गे देहरादून पोहोचले. देहरादूनमधील हवामान खराब होत. ते तेथे २ तास थांबले. यानंतर ते सकाळी 11 वाजता जिम कॉर्बेट नॅशनल पार्क येथे पोहोचले. नरेंद्र मोदी विकास योजनांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते अशी बातमी होती. इंडिया टुडेच्या बातमीचा हवाला देत नरेंद्र मोदी यांनी टायगर सफारी, इको टुरिझम झोन आणि बचाव केंद्राचे उद्घाटन केले.

घड्याळात  दुपारी 3-10 वाजले होते. पुलवामा येथील सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्याविषयी बातमी आहे की ते कालागढहून मोटरबोटवरून ढिकला येथे प्रवास करत होते.  त्यांनी ढिकला येथील जंगलास भेटही दिली. यानंतर नरेंद्र मोदींना रुद्रपुरात जाहीर सभेला संबोधित करायचे होते. हवामान खराब होते. आणि 25 मिनिटानंतर नरेंद्र मोदी यांना कळविण्यात आले की पुलवामा येथे हल्ला झाला आहे.  त्यांना उशीरा का कळविण्यात आले ? त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर नाराजी व्यक्त केली. रुद्रपूरची जाहीर सभा रद्द करण्यात आली. परंतु नरेंद्र मोदींनी रॅलीला फोनद्वारे संबोधित केले. खराब हवामानामुळे नरेंद्र मोदी बराच काळ अडकले. नंतर ते बरेलीला पोहोचले. बरेलीतील हवाई पट्टीतून ते दिल्लीला रवाना झाले. या काळात ते सतत सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेत होते.

प्रश्न का उद्भवले ?
या घटनेनंतर एका आठवड्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की पुलवामा येथे सैनिकांवर हल्ला झाला होता, त्यावेळी नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये शुटिंग करत होते. सायंकाळी 7 वाजता जिम कॉर्बेट पार्कमधून बाहेर पडले. विरोधकांनी सांगितले की, नरेंद्र मोदी दिवसभर डिस्कवरी चॅनलसाठी एक डॉक्युमेंटरी शूट करत होते. तोपर्यंत शोचे नाव समोर आले नव्हते.

राहुल गांधी यांनी 22 फेब्रुवारी रोजी ट्विट केले. फोटोंसह. नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट पार्कमध्ये होते. कॅमेरा-माईक आणि सर्व साहित्य त्यात दिसत होते. ते म्हणाले,

 

"देशातील हुतात्म्यांच्या अंत: करणात वेदनांचा पूर आला होता आणि ते हसत नदीत फोटोशूट करत होते."

काही बातम्या आणि व्हिडिओही समोर येत होत्या. ते म्हणाले होते की पंतप्रधान कार्यालयाच्या दाव्यांचा खंडन करत नरेंद्र मोदींच्या त्या दिवसाच्या वेळापत्रकात वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. टीव्ही 9 भारतवर्षाने पंतप्रधानांचा  व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. त्यात म्हटले आहे की, 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा संध्याकाळी 7.30. वाजता जिम कार्बेटमधून बाहेर निघाला."

सायंकाळी साडेसात वाजता. एवढेच नाहीतर अमर उजलाच्या नैनीतालच्या आवृत्तीत सांगण्यात आले की संध्याकाळी सात वाजता नरेंद्र मोदी धनगढी गेटबाहेर आले.

भाजपाचं उत्तर
वायर आणि अनेक माध्यम संस्थांनी पंतप्रधान कार्यालयात प्रश्न पाठविले. 14 फेब्रुवारी, 2019 रोजी नरेंद्र मोदींच्या पूर्ण दिनक्रमाबद्दल आणि जेव्हा त्यांना पुलवामा हल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जे लोक नरेंद्र मोदींच्या दिनचर्यावर प्रश्न करतात ते पाकिस्तानला आनंदित करण्याची भाषा बोलत आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, कॉंग्रेस आणि पाकिस्तानची कामे एकसारखी दिसत आहेत. कॉंग्रेस राजकारण करीत आहे.  असे राजकीय उत्तर सांगितले गेले. परंतु पंतप्रधानांनी दिवसाच्या दिनक्रमांबद्दल उत्तर दिले नाही.

मग आला 'शो'चा ट्रेलर
हा गरम माहौल थोडा शांत झाला होता. 29 जुलै रोजी डिस्कव्हरीवरील ‘मॅन vs वाइल्ड’ शोचे आयोजन करणारे बीअर ग्रिल्स यांनी ट्विट केले. सांगितले की, १२ ऑगस्टला नरेंद्र मोदींसोबत शूट करण्यात आलेला 'मॅन vs वाइल्ड' हा भाग प्रसारित होईल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News