येत्या रक्षाबंधनाला बहिणीला काय देणार अविस्मरणीय भेट?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 11 August 2019
  • बहिणींची ‘माफक’ अपेक्षा असते
  • नक्कीच हसू येईल
  • ओवाळणी म्हणून ‘पाकीट’ चालत नाही

बहिण ..!!! बघायला गेले तर मुळात आपण बघूच शकत नाही हे भाऊ-बहिणीचं  नातं इतकं सुंदर,स्वच्छ आणि निर्मळ आहे आपण या नात्याची तुलना संपुर्ण विश्वात कुठेच करू शकत नाही हे नातं कितीही काहीही झाले तरी हे विश्व जोपर्यंत आहे तोपर्यंत या नात्याला कोणीच आणि कधीही तोडू शकत नाही.

आजकाल बहिणींना रक्षाबंधनाला ओवाळणी म्हणून ‘पाकीट’ चालत नाही. त्यांना ‘गिफ्ट’ द्यावं लागतं. पुन्हा ते ‘सरप्राइझ’ असावं अशी बहिणींची ‘माफक’ अपेक्षा असते. त्यातही ते जे कोणाकडे नसेल असं सगळ्यात वेगळं असणारं गिफ्ट असावं असं तिला वाटतं त्यातून ते गिफ्ट बहिणीला आवडेल याची शाश्वती नाही. म्हणूनच या गिफ्टबंधनात समस्त बंधूवर्गाची गोची होते. जाणून घेऊयात अशी काही गिफ्ट… हे गिफ्ट पाहिल्यावर बहिणीच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल..

ड्रेस आणि ज्वेलरी –
२६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाला तुमच्या प्रिय बहिणीला ट्रेंडी ज्वेलरी द्या. किंवा एखादा छानसा डिजायनर ड्रेस गिफ्ट करा. तिला हे रक्षाबंधन कायम स्मरणात राहिल.

मोबाईल फोन – रक्षाबंधनाला स्मार्टफोन किंवा छानसं गॅझेटही गिफ्टसाठी चांगला पर्याय असू शकतो. तुमची बहीण गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडे मोबाईलचा हट्ट करत असेल तर रक्षाबंधनाचा योगायोग सााधून एखादा चांगला मोबाईल भेट द्या. तुम्ही ऑनलाईन स्मार्ट फोन मागवू शकता. सध्या मोबाईल फोनवर ऑनलाईन चांगल्या ऑफर आहेत.

स्पा पॅकेज – जर तुमची बहीण एखाद्या कंपनीमध्ये किंवा सरकारी ठिकाणी काम करत (जॉब) असेल तर या रक्षाबंधनाला स्पा पॅकेज गिफ्ट म्हणून चांगला पर्याय आहे. धावपळीमध्ये तिला थोडाफार आराम मिळेल.

घड्याळ – या रक्षाबंधनाला एखादे स्टाईलिश घड्याळ भेट द्या. हे घड्याळ भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही कपड्यावर मॅच व्हावे ही काळजी घ्या.

फोटो फ्रेम – फोटो ही अशी गोष्ट आहे ज्यात तुमचा आठवणी साठवलेल्या असतात. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी फोटो मदतगार ठरत असतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या बहिणीचा एखादा जुना फोटो असेल जो घरच्या जुन्या फाटक्या अल्बममध्ये धूळ खात पडला असेल त्याला काढून त्याची एक फ्रेम करूनही तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता. खूप जास्त पैसे न खर्च करता नेहमीसाठी तिच्या आठवणीत राहिल असं हे गिफ्ट ठरू शकतं.

पुस्तक – बाजारातील इतर महागड्य़ा वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा तुमच्या बहिणीला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडीच्या लेखकांची पुस्तकेही गिफ्ट देऊ शकता.

तुमच्या बहिणीला जर संगीत ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडीच्या संगीताचा म्युझिक बॉक्स गिफ्ट करू शकता
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News