सनी लिओनी काय करतीय लॉकडाऊनमध्ये; जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020

अभिनेत्री सनी लिओनी हिने तर तब्बल 40 दिवस मेहनत घेऊन "ब्रोकन ग्लास' नावाचे चित्र साकारले आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी जिवाची पर्वा न करता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. या काळात चित्रीकरण बंद असल्याने कलाकारही वेगवेगळ्या कामांत गुंतवून घेत आहेत. अभिनेत्री सनी लिओनी हिने तर तब्बल 40 दिवस मेहनत घेऊन "ब्रोकन ग्लास' नावाचे चित्र साकारले आहे.

अनेक सेलिब्रिटी कुटुंबीयांसोबत "क्वालिटी टाईम' घालवत आहेत. कोणी वर्कआऊट करत आहेत, तर कोणी साफसफाई आणि घरकाम करत आहेत. आपण काय करत आहोत, याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर शेअर करत आहेत. काही कलाकार आपल्या आवडत्या छंदात मन रमवत आहेत. अभिनेत्री सनी लिओनी पेंटिंगमध्ये रमली आहे. तिने लॉकडाऊनमध्ये एक चित्र साकारले असून, त्यासाठी तब्बल 40 दिवस लागले आहेत.

"ब्रोकन ग्लास' असे नाव दिलेल्या चित्रासोबतचे छायाचित्र तिने समाजमाध्यमावरून शेअर केले आहे. "लॉकडाऊनमध्ये फायनली माझं पेंटिंग तयार झालं. त्यासाठी मला 40 दिवस लागले. सध्याच्या काळात प्रत्येक जण विखुरलेला आहे. यातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक तुकडा महत्त्वाचा आहे. आपण एकत्र आलो तर परिपूर्ण होऊ. माझं सर्वांना खूप खूप प्रेम'', अशी भावना तिने व्यक्त केली आहे. सध्या ती वेगवेगळ्या कामांत व्यग्र असून, पती आणि मुलांसोबत वेळ घालवत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News