कोरोनानंतर रोजगारासाठी सरकारने काय पाऊल उचलले पाहिजे ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020

कोरोनानंतर रोजगारासाठी सरकारने काय पाऊल उचलले पाहिजे ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

कोरोनानंतर रोजगारासाठी सरकारने काय पाऊल उचलले पाहिजे ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

कोरोनाच्या काळात अनेकांच्या हातचा रोजगार गेला, तो पु्न्हा मिळतोय की नाही, हे निश्चित माहित नाही. तसेच कोरोनाच्या काळात भेटेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अनेक तरूण नोकरीच्या शोधात आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा कालावधी अजून निश्चित सांगता येणार नाही. शहारातला कोरोना आता गावाकडं सरकला आहे. त्यामुळे गावाकडे सुध्दा भयदायक वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोनामुळे देशाचं अर्थिकचक्र जागीच आहे, अशा परिस्थितीत कोरोनानंतर रोजगारासाठी सरकारने काय पाऊल उचलले पाहिजे ? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रुपमध्ये आज मनसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडकं मतं आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

आपल्या देशात अगोदरच कितीतरी तरुण/ लोक बेरोजगार होते. कामाच्या शोधात भटकत होते. त्यात या कोरोना रोगाने येऊन धुमाकूळ घातला. ज्यांना रोजगार होते. ते पण या रोगाच्या काळात बेरोजगार झाले. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात भारतात वाढली. यामुळे या रोगानंतर  भारतातील कंपनीमध्ये सरकारने नवीन भरती करणे आवश्यक आहे.  भरतीसाठी मोठ्या जागा भरणे गरजेचे आहे. सर्वाना समान संधी देणे आवश्यक आहे. स्पर्शा परीक्षांसाठी जो मोठा अवधी लावतात. ते न लावता लवकरात लवकर त्या घेऊन त्याचे निकाल जाहीर करावेत. जेणे करून बेरोजगार कमी होऊन सर्वाना रोजगार उपलब्ध होतील.

- स्वाती शेषराव बडे (रूईया कॉलेज)

आता या कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. कारण कोरोनामुळे जे छोटे मोठे उद्योग धंदे चालत होते. ते पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी खूप वाढली आहे. सरकारने लवकर स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या पाहिजेत. छोट्या-मोठ्या उद्योग धंदे चालू करण्यासाठी राष्ट्रीय बँक असेल किंवा जिल्हा बँक असेल याच्या करीता नवीन कर्ज योजना आणली पाहिजे, जेणे करून लहान व मोठ्या धंदे चालू शकतील व अनेक बेरोजगार लोकांना कामे मिळतील. त्यांना या कोरोनाच्या काळात जे नुकसान झालं त्याची थोडीफार भर करता येईल. अनेक अशा गोष्टी आहेत त्यातून सरकार ला लोकांची मदत करता येईल आणि सरकार हे करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल.

- नदीम डांगे (इंजिनिअर)

भारताच्या वाढत्या लेकसंख्येमुळे बेरोजगारीची समस्या ही वाढत होतीच आणि आता त्यात कोरोनामुळे आणखी भर पडली आहे. सगळ्याच क्षेत्रात बेरोजगारी वाढली आहे. सरकारने यावर लक्ष दिले पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या सोबतच लोकांना उद्योग-धंदा करण्यास लोकांना प्रवृत्त करायला हवेत त्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले पाहिजे. उद्योग-धंदा सुरू करण्याची पद्धत ही सोपी आणि सरळ  करावी.

- श्रध्दा कोकरे

कोरोनानंतर सरकार कोणत्या क्षेत्रात उद्योग होऊ शकतो, असे क्षेत्र मध्यम वर्ग आणि कनिष्ट वर्ग यांना उपलब्ध करून द्यावे. कारण या दोन वर्गाला उदरनिर्वाह करण्यासाठी अर्थिक गरज असते. तर आणि जास्तीत जास्त रोजगार भारतीयांना उपलब्ध करून द्यावे. परदेशात कामासाठी आणि शिक्षणसाठी  जाणाऱ्या लोकांना भारतातच त्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्यावे, जेणे करून भारताची आर्थिक स्थिती सुधारेल

- विजयकुमार कटारे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाच्या हातातील पैसे कमी झालेले पाहायला मिळतात. यात त्याच्या सेविंग चा देखील समावेश आहे. जेव्हा उत्पन्नाचा स्रोत काहीही नसताना व सेव्हिंग कमी होताना माणसाची क्रयशक्ती कमी होते. म्हणजे काय तर सर्वसामान्य माणूस फक्त गरजेच्याच वस्तू खरेदी करतो. तो इतर गोष्टीना तुलनेने कमी महत्व देतो. याचा दूरगामी परिणाम कंपन्याच्या उत्पादनावर होतो. की उत्पादनमूळे कंपनीवर आर्थिक संकट ओढवते यातुन अनेक नोकऱ्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हीच क्रयशक्ती कमी झालेली पाहयला मिळते.

रोजगार उपलब्ध करायचा असेल तर मोठ्या कंपन्याना भांडवल उभे करून देण्यात यावे. सर्वसामान्य लोकांच्या हाती पैसे योग्य रीतीने पोहोचले पाहिजेत. त्याचबरोबर नवीन उद्योगांची प्रक्रिया सुलभ करावी.

- विनायक पाटील

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News