काय आहे रेशम टिपणीसला पसंद आणि कशात आहे तिचा आनंद  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

विविध मराठी व हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये मी काम केले आहे.तर खबरदार चित्रपटात आयटम साँग केले आहे. मी मूळची मुंबईची आहे. कला क्षेत्रातील गेल्या ३० वर्षांतील कामाचा अनुभव खूप चांगला आहे. माझी मुलगी रिषिका आणि मुलगा मानव यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे मला माझ्या करिअरसाठी पुरेसा वेळ देता आला.

मी अभिनय क्षेत्रात काम करायचे असे कधी ठरवले नव्हते. टेक्‍स्टाईल डिझाइनिंगचे शिक्षण घेत असताना मी एक ऑडिशन दिली अन्‌ त्यात माझे सिलेक्‍शन झाले. मी १९९२मध्ये बाजीगर या हिंदी चित्रपटामध्ये अंजली सिन्हाची भूमिका साकारली होती.

त्यानंतर १९९४मध्ये कॅम्पस मालिकेत काम केले होते. कॅम्पस मालिका खूप गाजली. श्रीमान श्रीमती, राणी केतकी की कहानी, साहेब, बिवी और बॉस, मुझसे कुछ केहती है...खामोशियाँ, दो दिल एक जान, घर एक सपना, चंदा का पालना और रेशम की दोरी, बसेरा, सतरंगी ससुराल, हाफ मॅरेज, तू तू मै मै, बिग बॉस मराठी आदी मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

तसेच सत्त्वपरीक्षा, भीष्म प्रतिग्या, मानसन्मान, जय हो, मेरे यार की शादी है, इश्‍क है तुमसे अशा विविध मराठी व हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये मी काम केले आहे.तर खबरदार चित्रपटात आयटम साँग केले आहे. मी मूळची मुंबईची आहे. कला क्षेत्रातील गेल्या ३० वर्षांतील कामाचा अनुभव खूप चांगला आहे.

या क्षेत्रात काम करताना मला माझ्या आईने व माझी मुलगी रिषिका आणि मुलगा मानव यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे मला माझ्या करिअरसाठी पुरेसा वेळ देता आला. अभिनयासह मी माझी कुकिंगची आवडही जोपासली आहे. ‘लोचा झाला रे’ हा माझा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News