पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर युवकांची भूमिका काय असायला हवी ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020

पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर युवकांची भूमिका काय असायला हवी ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर युवकांची भूमिका काय असायला हवी ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सध्या भारतात अनेक राज्यात अतिवृष्टी सुरू आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांनी समुद्राचं रूप धारण केलं आहे. याचा फटका ग्रामीण भागाला अधिक बसतो, कारण मागच्यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातलं महापुराचं चित्रं अतिशय भयदायक होतं. तसंच २०१८ मध्ये केरळ मध्ये झालेली अतिवृष्टी आपण टिव्हीच्या माध्यमातून पाहिली...पण पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर युवकांची भूमिका काय असायला हवी ? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रुपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

आज महाराष्ट्रातील अनेक भागात अती-मुसळधार पाऊस पडतो आहे. गेल्या वर्षी सांगली-कोल्हापूरने जे काही अनुभवले त्याची अनुभूती परत नशिबी येऊ नये हीच प्रार्थना सर्वजण करत आहेत. कोरोनामुळे आज ग्रामीण भागात खूप लोक मुंबई- पुण्याहून आलेले आहेत आणि इथूनच त्यांच work from home चालू आहे. हे सगळं करत असताना तरुणांनी आताच्या काळात आपल work from home सांभाळून समाजात थोडीशी सकारात्मकता आणली पाहिजे. माणूस हा अनुभवातून शिकत असतो, तर मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन, तरुणांनी Preventive Measures वर काम केलं पाहिजे. जे कोणी लोक नदीकिनारी वास्तव्यास असतील त्यांना स्थलांतरणाची व्यवस्था करून देणे आज गरजेचे आहे. कोरोनाशी आपण लढतोच आहे आणि आता पूर परिस्थितीशी सामान करायचा आहे.

- केदार जोशी, डाटा अॅनालिस्ट, अॅनड्रोमेडा डिजीटल

आपल्या भारत देशाचे माझी राष्ट्रपती आणि ज्यांना मिसाइल मॅन म्हणून ओळखले जातात.  डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांनी युवकांना देशाची खरी संपत्ती म्हणून संबोधले आहे. खरचं देशाच्या प्रगतीसाठी युवा शक्ति खूप महत्वाची आहे.  त्यामुळे देशात निर्माण झालेल्या छोट्या-छोट्या संकटात सुद्धा युवकांनी मदतीचे पाउल उचलायला हवीत. सध्या कोरोना रोगाने धुमाकूळ घातलेला असताना राज्यात परत बदललेल्या ऋतू चक्राने पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशावेळी ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होणार आहे. त्याठिकाणी जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील लोकांना घाबरून जाऊ नये असे सांगून सकारात्मक विचार करायला लागावेत जेणे करून त्यांची मानसिकता खालावली जाणार नाही. लोकांना मदतीचा हात देऊन त्या ठिकाणाहून हलवून सुरक्षित ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची सोय करावी. आताचे युवक सर्व शिक्षित असल्याने सरकारी योजना कायदे सर्वांची माहीत असल्याने त्याच्या मदतीने सरकार पर्यन्त सर्व परिस्थिती काय आहे हे पोहोचवले पाहिजे. सरकारी योजनांचा लाभ त्यांना घेऊन दिला पाहिजे. अशा प्रकारे सर्वांना मदत करणे गरजेचे आहे. या बरोबरच पुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी वृक्ष लागवडीचा संदेश सर्वाना देऊन जनजागृती करायला हवी.

- स्वाती शेषराव बडे  (रूईया कॉलेज)

उध्दवलेल्या पुराच्या परिस्थीमध्ये तरूणांनीचं शेतकरी, व्यापारी,  सामान्य जनतेला मदतीचा हात दिला पाहिजे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी घरात किंवा गावात शिरलं असेल त्या लोकांची व्यवस्था शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात करायला हवी. आता आपल्याला दोन गोष्टींशी लढायचं आहे. एक म्हणजे कोरोना आणि दुसरं म्हणजे पूर...महापूरामुळे पसरलेल्या आजारांची सुध्दा काळजी घ्यायला हवी. विशेष म्हणजे पुरामुळे एखादं जनावर दगावलं तर त्याची विल्हेवाट लावावी म्हणजे आजार पसरणार नाही. त्याचबरोबर पुरात अडकलेल्या लोकांच्यासाठी पिण्यासाठी स्वच्छ पाणी इत्यादी काळजी तरूणांनी घ्यायला हवी.

- नदीम डांगे (अभियंता)

पूर येणे , किंवा सामाजिक दृष्ट्या काही संकट आपल्या अवतीभोवती ओढवणे ह्यात  दोष कोणाचा,कोण जवाबदार किंवा सत्तेवर असलेले अधिकारी हे जवाबदार आहेत त्यांनीच ह्या सगळ्यातून मार्ग काढले पाहिजेत असे विचार करण्यापेक्षा आपण एक सुशिक्षित , जाणकार नागरिक असून अश्या परिस्थितीत माणुसकीने विचार करणे महत्वाचे ...  पूर परिस्थिती निर्माण होत असेल तर वेळीच सगळ्यांनी एकत्र येऊन एका संघटने प्रमाणे कार्याची योजना तयार करावी ... पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पंचायत समितीस माहिती पुरवणे , लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना सहयोग करणे , शाळा आणि सार्वजनिक कार्यालये (लग्नाचे हॉल ,धर्मशाळा )या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करावी , सरकारी अधिकाऱ्यांशी, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून बोटीतून  संपर्क तुटलेल्या छोट्या छोट्या गावातील लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा, अथवा त्यांच्या पर्यंत प्राथमिक गरजा पुरवण्यास मदत करावी . आधीच्या काळात अशी परिस्थिती उद्भवली असेल तर त्याचा अनुभव लक्षात घेऊन आताच्या परिस्थितीवर मात कशी करता येईल याचा विचार करणे ,  सध्या जगभर ओढवलेल्या कोरोनाच्या  संकटाशी लोक दोन हात करत आहेत. अश्यातच हे संकट ओढवणे म्हणजे खरी माणुसकीची परीक्षा आहे. अश्या वेळी परिस्थितीचे राजकारण करून लोकांच्या परिस्थितीचा फायदा न घेता समाजाचे काही देणं लागतो अश्या भावनेने स्वत:मधली  माणुसकी ओळखून आलेल्या संकटाला सामोरे जाणे योग्य...  असे मला वाटते ...

- हर्षदा यादव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News