गणपतीची मूर्ती कशी असावी

अशोककाका कुलकर्णी
Sunday, 9 August 2020
  • मित्रांनो ज्यांच्या घरी गणपती पुजला जातो किंवा जे गणेशोत्सव करतात त्यांनी हा लेख नक्कीच वाचावा.

मित्रांनो ज्यांच्या घरी गणपती पुजला जातो किंवा जे गणेशोत्सव करतात त्यांनी हा लेख नक्कीच वाचावा. बरेच जण गरुडावर बसलेली / सिंह / बैल वाहन असलेली किंवा उभी किंवा कुठल्यातरी देवाच्या खांद्यावर / हातावर असलेली मूर्ती सर्रास गणेशोत्सवासाठी आणत असतात, ह्या मुर्त्या शास्त्रोक्त नाहीत, अशा मुर्त्या पूजाव्यात की, नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा भाग आहे. पण शास्त्रोक्त मुर्त्या वापराव्यात हा माझा आग्रह/विनम्र विनंती आहे.

शास्त्रोक्त मुर्त्या म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घ्यावे

आपल्या वेद आणि उपनिषदान मध्ये एखाद्या देवतेचा जसा वर्णन आहे, त्या वर्णांशी साधर्म्य असणाऱ्या मुर्त्या म्हणजेच शास्त्रोक्त मुर्त्या. आत्ता तुम्ही म्हणाल की, आम्ही कुठे वेद-उपनिषदांचा अभ्यास करत बसणार, पण ह्यातलच एक गणेशाच प्रभावी स्तोत्र आहे. ज्याला आपण "गणपती अथर्व-शीर्ष " म्हणतो, हे स्तोत्र बहुतांशी गणेश भक्तांना तोंडपाठ नसल तरी ऐकून माहित आहेच, ह्या स्तोत्रात गणेशाच वर्णन आहे की,

"एकदन्तं चतुरहस्तं पाशमंकुश धारिणम । रदं च वरदम

हस्तैर बीभ्राणं मुषकध्वजाम ।रक्तम लम्बोदरं ,

शूर्पकर्णकम रक्तवाससम । रक्तगंधानुलीप्तागं

रक्तपुष्पे:सुपुजीतम ।।"

ह्या गणेश एकदंत असून ह्याला ४ हात आहेत, वरच्या २ हाता मध्ये ह्या गणेशाने पाश आणि अंकुश ही आयुधे धारण केली आहे, ह्याचा एक हात वरद मुद्रेत असून ह्याचे वाहन मूषक आहे, हा लम्बोदर म्हणजे ह्याचे उदर किंवा पोट मोठे अर्थात लंब आहे, ह्याचे कान सुपा सारखे असून रक्त वर्णाच्या गंधाची उटी ह्याला लावलेली आहे आणि हा रक्त वर्णीय फुलांनी पूजिला जातो. गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बैठी / बसलेली असावी कारण जेव्हा आपण प्राण- प्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते, गणेशाचा प्राणमय देह त्या मूर्ती मध्ये प्रतिष्ठीत होतो, गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत, पाहुण्यांना असे उभे ठेवणे बरे वाटते का? अजून एक गोष्ट ध्यानांत घ्या उभा गणपती कुठेच पुजला जात नाही, जुनी गणेशाच्या पुजातल्या मुर्त्या पहिल्या की, लक्षात येईल की सगळ्याच मूर्ती बैठ्या आहेत !

बरेच कलाकार त्यांच्या कल्पकतेचा वापर करून, गणेशमूर्तीची शरीरयष्टी बदलतात जे पूर्णपणे चुकीचे आहे, आपल्या हिंदू देवतांच्या मूर्ती प्राण-प्रतिष्ठा न करता सुद्धा जेव्हा पुजल्या जातात तरीही त्यात दैवी उर्जा प्रकट होते, कारण आपल्याकडील देवतांच्या मुर्त्या ह्या अतिशय विज्ञानबद्ध पद्धतीने आकारल्या आहेत, ऋषी-मुनी ध्यानस्त असताना जेव्हा त्यांना देवतांचे दर्शन व्हायचे तेव्हा ते त्यांचा वर्णन लिहून ठेवायचे ज्याचा उपयोग पुढच्या पिढ्यांना ध्यान करताना झाला आणि ह्यातून मूर्ती-शास्त्र अस्तित्वात आले. देवी-देवतांना कुठलाही स्थूल देह नसतो. तर त्या प्राणमय आणि प्रकाशमय स्वरुपात असतात, ह्या प्राणमय आणि प्रकाशमय रूपाचे ध्यान सामान्य माणसा करू शकत नाहीत हे जाणून ऋषींनी मूर्ती निर्माण केल्या.

आत्ता तुम्हीच ठरवा जेव्हा अश्या फेर-बदल झालेल्या मुर्त्या तुम्ही आणता तेव्हा तुम्हाला ह्याचा किती फायदा होतो?

कारण पूजन होणाऱ्या मूर्तीन मधून स्पंदने उत्सर्जित होत असतात !! आणि जशी मूर्ती तशी स्पंदने हे झाले मूर्तीमधील साध्या बदलांचे, पण गेले ३-४ वर्ष बऱ्याच गणेशमूर्तीन मध्ये प्रभावळी लावायची पद्धत चालू झाली आहे आणि ह्या प्रभावळी मध्ये कीर्तिमुख असते, पण किर्तीमुखाची शिंग आणि ह्या गणेशमूर्तींमधील प्रभावळीतील किर्तीमुखाचे शिंग ह्यात खूप फरक आहे, ही शिंगे एखाद्या राक्षसाची शिंगे असल्या सारखीच वाटतात, हा काय प्रकार आहे मला काहीही समजलेले नाही गणेशाच्या मूर्ती मध्ये राक्षसांच्या शिंगांची किंवा राक्षसी शिंगे असण्याचा कारणच काय? असो ! सावध कारण माझ काम होते जे मी केल बाकी ज्याची त्याची इच्छा !

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News