‘सेकंड हॅंड स्मोकिंग’चे नकळत बळी?

डॉ. अनंतभूषण रानडे आणि डॉ. अमित भट्ट, कर्करोगतज्ज्ञ
Monday, 13 May 2019

‘सेकंड हॅंड स्मोकिंग’ समजून घेणे आवश्‍यक आहे. तुम्हाला वाटते की, मी सिगारेट ओढत नसल्याने मला कर्करोगाचा धोका नाही. पण, हा गैरसमज आहे. कारण, आपण घरी, कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या जवळ असतो.

आपल्या शरीरासाठी प्रत्येक श्‍वास महत्त्वाचा असतो. आपण घेतलेला प्रत्येक श्‍वास फुफ्फुसात जातो. त्या श्‍वासातील प्राणवायू शोषून घेऊन उच्छवासातून कार्बन डायऑक्‍साईड बाहेर टाकण्याचे काम फुफ्फुस करते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीला प्राणवायूचा पुरवठा करणारे महत्त्वाचे अवयव म्हणजे फुफ्फुस. या यंत्रणेलाच कर्करोग झाला तर...

तुम्ही ओढलेले सिगारेटचे झुरके हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. फुफ्फुसाच्या कर्करोग होण्यामागे ७० टक्के कारण हे फक्त धूम्रपान असते. पण, काहीजण स्वतः धूम्रपान करत नाहीत, पण धूम्रपान करणाऱ्यांच्या बरोबर असतात. त्यांनाही हा धोका २० ते ३० टक्के असतो.

हे नेमके कसे घडते, त्यासाठी ‘सेकंड हॅंड स्मोकिंग’ समजून घेणे आवश्‍यक आहे. तुम्हाला वाटते की, मी सिगारेट ओढत नसल्याने मला कर्करोगाचा धोका नाही. पण, हा गैरसमज आहे. कारण, आपण घरी, कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या जवळ असतो.

सिगारेटचा धूर हवेत सोडतात त्याच वेळी तो आपल्या श्‍वासातून शरीरात जातो. त्यामुळे शरीराच्या दृष्टीने तुम्ही धूम्रपान केलेले असते. त्या सिगारेटच्या धूरातील निकोटिन आणि इतर घातक रसायनांचा धूर तुमच्या शरीरात जात असतो. याला ‘सेकंड हॅंड स्मोक’ किंवा ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ म्हणतात. त्यातून फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्‍यता २० ते ३० टक्के असतेच पण, त्याचबरोबर हृदयविकारासह इतर व्याधींचा धोकाही वाढतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News