काय म्हणते, अभिनेत्री रसिका सुनील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 February 2020

वेस्टर्न ते ट्रॅडिशनलपर्यंतच्या सर्व कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल असते. मुलं जे कपडे घालतात म्हणजे थोडे फार लूज असे कपडे घालायला फार आवडते. कपड्यांवरील फुटवेअरबद्दल सांगायचं झालं तर मी माझ्या बऱ्याचशा ड्रेसेसवर हिल्स घालणं पसंत करते.

कपडे खरेदी करताना माझा विचार नेहमी हाच असतो की, कोणत्या समारंभासाठी ते कपडे विकत घेते आहे? त्याचबरोबर हा समारंभ कुठे आहे, तो कोणता समारंभ आहे, या सगळ्यांचा विचार करते. मला सगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात.

वेस्टर्न ते ट्रॅडिशनलपर्यंतच्या सर्व कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल असते. मुलं जे कपडे घालतात म्हणजे थोडे फार लूज असे कपडे घालायला फार आवडते. कपड्यांवरील फुटवेअरबद्दल सांगायचं झालं तर मी माझ्या बऱ्याचशा ड्रेसेसवर हिल्स घालणं पसंत करते. कपड्यांवर कम्फर्टेबल आणि आरामदायी असे फुटवेअर घालते.

मी तरुणींना आवर्जून सांगेन की, तुमच्या शरीरयष्टीचा तुम्ही चांगला अभ्यास करा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला काय चांगलं दिसतं हे पाहा. त्यानुसार कपडे खरेदी करा. फुटवेअरच्या बाबतीतही तुम्ही जे कपडे घालता त्यावर सुटेबल असे फुटवेअर निवडा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News