शिक्षक होण्यासाठी काय आवश्यक?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • 'शिक्षक' हा असा पेशा आहे जो समाजमध्ये आपल्याला एक वेगळे आणि आदराचे स्थान मिळवून देतो. त्याचप्रमाणे एक सुजाण नागरिक घडविण्याचे काम हे शिक्षकाचेच असते.

करिअर कशात करावे ? हा प्रश्न प्रत्येक तरुणांना पडतोच. आजच्या स्पर्धात्मक युगात  उच्च दर्जा मिळविण्यासाठी  इंजिनीअर , डॉक्टर, वकील या क्षेत्राकडे पहिले जाते. परंतु त्यापलीकडे 'शिक्षक' हा असा पेशा आहे जो समाजमध्ये आपल्याला एक वेगळे आणि आदराचे स्थान मिळवून देतो. त्याचप्रमाणे एक सुजाण नागरिक घडविण्याचे काम हे शिक्षकाचेच असते.

शिक्षक बनण्याचे जुने पारंपरिक राजरस्ते आहेतच. उदाहरणार्थ, बारावीनंतर डीटीएड, चित्रकलेसाठी एटीडी, बीएड पदवी, बीएड पदवीनंतर एमएड व पदव्युत्तर पदवीनंतर नेट वा सेट देऊन शिक्षक बनणे; पण या रस्त्यांनी जाणारे बहुसंख्य या क्षेत्राबद्दल कडवटपणेच बोलतील; कारण संस्थाचालक, नोकरी, अस्थैर्य यांच्याशी सामना करताना त्यांची मानसिक कोंडी झालेली आढळते.

यालाच जोड मिळत जाते, ती आर्थिक तारांबळीची. मग साऱ्याच शिक्षकी पेशावर ही कडवट साय पसरलेली पसरलेली दिसू लागते. ज्यांनी ही पारंपरिक वाट न पकडता काही विशिष्ट कौशल्ये आत्मसात केली आहेत, त्यांची मागणी, त्यांचे यश प्रचंड प्रमाणात वाढते आहे, हे लक्षात घ्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News