तुमच्या शरिरात काय आहे; प्लास्टिकची करामत?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणारे तेल प्रथम शुद्ध करून घ्यावे लागते. त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात. त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते. प्लास्टिक साधारणपणे उच्च आण्विक द्रव्यमानाचे सेंद्रिय पॉलिमर्स असतात. त्यामध्ये अन्य घटकही असतात. ते सहसा कृत्रिम असतात. सामान्यत: पेट्रोकेमिकल्समधून मिळतात.

२०५० पर्यंत तिप्पट होणार
जागतिक पातळीवर प्रतिवर्षाला ३३० दशलक्ष टनांपेक्षा अधिक प्लास्टिकची निर्मिती होते. हा वेग लक्षात घेता २०५० पर्यंत प्लॅस्टिक निर्मिती तिपटीने (सुमारे एक हजार दशलक्ष टन) वाढण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

सोयीसाठीच्या शोधाने केली गैरसोय

मानवाने न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे प्लास्टिक हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे ऱ्हास होत नाही, तसेच तो नष्टही करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगापुढे उभी ठाकली आहे.    

प्लास्टिक वेस्ट आयात
देशात कमी प्रतीचे किंवा विघटन न होणारे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरात येते. यात भर पडली आहे ती परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची (प्लास्टिक वेस्ट). काही वस्तू तयार करण्यासाठी हा कचरा आयात केला जातो. आयात केल्या जाणाऱ्या या कचऱ्यामुळे समस्या आणखी उग्र होत असल्याचे जाणकारांचे मत आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News