स्थूलतेचं मूळ कशात आहे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

लहान मुलांमध्ये छातीचं प्रमाण वाढताना दिसतं, मुलींमध्ये चेहऱ्यावर केस येतात. त्यावरच्या उपचारांचे प्रमाण वेगाने वाढताना आपल्याला दिसते. चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी) वाढतोय. पूर्वी प्रसूतीनंतर महिलांना येणारे स्ट्रेच मार्क आता लहानपणीच मुलांच्या अंगावर दिसत आहेत. या सगळ्याच्या उपचारांसाठी पालक वेगवेगळ्या ठिकाणी धावताना दिसत आहेत. ही सगळी लक्षणे म्हणजे शरीरातील चयापचयाची क्रियाबदल असल्याची ठळक लक्षणे आहेत. त्यातून स्थूलता वाढत असल्याचे संकेत शरीर देत असते. हीच रुग्णाला शास्त्रीय उपचार देण्याची योग्य वेळ असते.

 सध्या कोणत्याही शाळेतील ३५ ते ४० मुलांच्या वर्गात डोकावलं, की जाणवतं निम्मी मुलं ही जाड आहेत. जाड म्हणजे सुदृढ असा याचा अर्थ होत नाही, तर त्याचा अर्थ स्थूल असा होतो आणि नेमकी हीच समस्या वयाच्या चाळिशी-पंचेचाळीशीच्या पालकांना भेडसावत आहे. पण, या समस्येचं मूळ नेमकं कशात आहे, हा प्रश्‍न आपल्याला पडतो नं? खरंतर, जगभरात लहान मुलांमधील स्थूलता ही एक लाट निर्माण होत आहे. त्याचा थेट संबंध हा त्यांच्या करिअरशी जोडला जातोय.

मुलांच्या डोक्‍यावर करिअर नावाचं ओझं ठेवलं जातं. त्यात त्यांचं बालपण कोमेजून जातंच, तसेच त्यांच्या शरीराचंही मोठं नुकसान होतं. हे कसं काय, असा पुढचा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल नं? इयत्ता सातवी, आठवीपासून ‘आयआयटी फाउंडेशन’ कोर्स सुरू होतात. एकीकडे शाळेचा अभ्यास, दुसरीकडे करिअरची तयारी यात मुलं अडकतात. शाळा, क्‍लास, फाउंडेशन कोर्स यात एक-एक दिवस जातो. एकेका परीक्षेच्या अभ्यासात वेळ जातो. खेळणं, व्यायाम यांपासून मुलं दूर राहतात. या सगळ्याचा परिणाम दहा-बारा वर्षांनंतर मुलांवर दिसायला लागतो. त्यामुळे या वर्गातील मुलं आपल्याला जाड दिसतात. 

स्थूलता हा एक आजार आहे. घरातील दोनपैकी एक मुलगा लठ्ठ असेल, तर तो त्याचा दोष कसा समजायचा? दुसरा मुलगा घरात जे खातो, जे पितो, जशी त्याची जीवनशैली आहे, तशीच या लठ्ठ मुलाचीही आहे. मग फरक कुठं पडतो? फरक पडतो, तो आपल्या शरीरामध्ये! त्यातूनच स्थूलता या आजाराची जगभर लाट निर्माण होत आहे. कृत्रिमपणे पिकविण्यात येणारी फळं, उत्पादनवाढीसाठी सर्रास वापरली जाणारी औषधं, गाईचं दूध वाढविण्यासाठी दिले जाणारे इंजेक्‍शन या सर्वांचा परिणाम आता आपल्याला दिसू लागला आहे. वर्गातील स्थुलांची वाढणारी संख्या हे त्याचंच एक दृश्य रूप आहे!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News