व्हाइट कोट हायपरटेन्शन नक्की आहे तरी काय ? जाणून घ्या
- आपल्या परिसरातील दूषित वातावरणामुळे खूप प्रकारचे आजार दिसून येतात.
- तुम्ही मलेरिया,टायफॉईड ,डेंगू ,कावीळ इ. हे तुम्ही ऐकलंच असेल पण व्हाइट कोट हायपरटेन्शन हा आजार कधी ऐकलाय का?
या दूषित वातावरणामुळे खूप प्रकारचे आजार दिसून येतात. तुम्ही मलेरिया,टायफॉईड ,डेंगू ,कावीळ इ. हे तुम्ही ऐकलंच असेल पण व्हाइट कोट हायपरटेन्शन हा आजार कधी ऐकलंय का? तुम्ही जर ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तिथे जाऊन अचानक तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे का ? जर तुमचं उत्तर हो असेल, तर तुम्ही व्हाइट कोट हायपरटेन्शन या आजाराच्या खूपच जवळ आहात. जर या आजाराला तुम्ही दुर्लक्षं करत असाल तर खूप गंभीर समस्या उदभवून तुम्ही शेवटच्या घटका देखील मोजू शकता.
व्हाइट कोट हायपरटेन्शन एक असा आजार आहे की, ज्यांमध्ये मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढतं. परंतु ब्लड प्रेशर सामान्य वातावरणामध्ये नॉर्मल असतं. खरं तर ही समस्या जेव्हा होते, त्यावेळी व्यक्ती डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाते. त्यामुळे या हायपरटेन्शनच्या समस्येला डॉक्टरांच्या व्हाइट कोटमुळे 'व्हाइट कोट हायपरटेन्शन' असं नाव दिलं आहे.
साधारणतः जेव्हा तुम्ही एखादं काम करत असता , त्याप्रमाणे तुमंच ब्लड प्रेशर कमी जास्त होत असतो. ही एक सामान्य परिस्थिती आहे. परंतु व्हाइट कोट हायपरटेन्शनची समस्या तेव्हाच उद्भवते, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाताना नर्वस होता किंवा घाबरून जाता. अशावेळी जर ब्लड प्रेशर चेक केलं गेलं तर ते सामान्य ब्लड प्रेशरच्या तुलनेमध्ये वाढलेलं दिसतं. जास्तीत जास्त लोक डॉक्टरांकडे किंवा मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये घाबरून जातात. याचा थेट परिणाम ब्लड प्रेशरवर होत असतो.
तुम्हाला आता प्रश्न पडलाच असेल या आजारातून बाहेर पडायचं तरी कस ? तर हे आहेत उपाय :
नियमितपणे आपलं ब्लड प्रेशर चेक करावं आणि त्याचा रेकॉर्ड मेन्टेन करावा. 24 तास ब्लड प्रेशरचं रीडिंग घ्यावं आणि जाणून घ्यावं दिवसभरामध्ये तुमचं ब्लड प्रेशर कधी वाढतं आणि कमी होत आहे. सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांच्या सेवनानेही ब्लड प्रेशर वाढतं.
त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडिअमचे प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. जर डॉक्टरांकडे जाण्याची भिती वाटत असेल किंवा मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये गेल्यानंतर नर्वस होत असाल तर ब्लड प्रेशरचं रिडिंग घेण्याआधी रिलॅक्स करा आणि शांत व्हा. स्वतःला समजावून सांगा की, घाबरण्याची अजिबात गरज नाही.
डॉक्टर किंवा नर्सला लगेच ब्लड प्रेशर चेक करू देऊ नका. मनामध्ये डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल यांबाबत विचार करण्याऐवजी इतर गोष्टींचा विचार करा. त्यामुळे तुमचं मन डायवर्ट होऊन तुम्हाला भिती वाटणार नाही. तसेच तुम्ही शांत होण्यासाठी गाणीही ऐकू शकता.