गर्भासन असे करा!

मनाली देव, योग प्रशिक्षक
Saturday, 11 May 2019

आसनस्थिती शक्‍य असेल तितका वेळ टिकवावी. त्यानंतर, आसन सोडताना सावकाश एकेक हात काढावा व पूर्वस्थितीत यावे. या आसनामुळे पोटातील इंद्रिये आकुंचित होतात. त्यामुळे तेथील कार्यक्षमता वाढते.

हे बैठकस्थितीमधील तोलात्मक आसन आहे. प्रथम पद्‌मासन घालून बसावे. त्यानंतर, डावा हात डावी मांडी व पोटरीमधून घालावा. त्यानंतर, उजवा हात उजवी मांडी व उजव्या पोटरीमधून घालावा.

दोन्ही हात कोपरापर्यंत बाहेर घ्यावेत. त्यानंतर, डावा हात डाव्या गालावर व उजवा हात उजव्या गालावर ठेवावा. या वेळी गुडघे, मांडी जास्तीत जास्त पोटाकडे, शरीराच्या पुढील बाजूकडे घेण्याचा प्रयत्न करावा. पाठ ताठ ठेवावी. श्‍वसन संथ सुरू ठेवावे. नजर स्थिर ठेवावी.

आसनस्थिती शक्‍य असेल तितका वेळ टिकवावी. त्यानंतर, आसन सोडताना सावकाश एकेक हात काढावा व पूर्वस्थितीत यावे. या आसनामुळे पोटातील इंद्रिये आकुंचित होतात. त्यामुळे तेथील कार्यक्षमता वाढते.

पोटावर दाब आल्याने वायुविकार, अपचन, बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत मिळते. तोलात्मक आसन असल्याने एकाग्रता वाढण्यास, चिडचिड कमी होण्यासही हे आसन उपयुक्त आहे. परंतु, गुडघेदुखी किंवा पोटाची शस्त्रक्रिया झालेली असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा. आसन करताना हात गालापर्यंत पोचण्यासाठी हाताला खूप झटके देऊ नये. ओढूनताणून आसन करू नये. अन्यथा, हातांच्या स्नायूला दुखापत होऊ शकते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News