रात्रीच्या जेवणात नेमकं काय खावे? जाणून घ्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 February 2020
  • दुपारी जेवणाची वेळ निश्चित नसते. त्यामुळे रात्री घरी गेल्यावर मोठ्या प्रमाणात आहार घेण्यात येतो.
  • मात्र त्यासाठी रात्री अनेकांना काय खावे असा देखील प्रश्न पडतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या आहाराला घेऊन विशेष लक्ष देताना दिसतो. सकाळी, दुपारी आणि रात्री जेवणाच्या पद्धतीत आणि वेळेत फरक पडला तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होताना दिसतो. आज प्रत्येकालाच आपल्या वजनावर कंट्रोल करायचा असतो. त्यामुळे कधी काय खावे हा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर असतो. हे आहाराचे गणित योग्यपद्धतीने मांडल्यास वजन कंट्रोलमध्ये राहतेच मात्र आरोग्य देखील चांगले राहते. 

अनेकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी पोटभर नाश्ता करावा, दुपारी माध्यम पद्धतीने जेवावे तर रात्री अल्पाहार घ्यावा. मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार सकाळी अनेकांना नाष्ट्याला वेळ मिळत नाही. दुपारी जेवणाची वेळ निश्चित नसते. त्यामुळे रात्री घरी गेल्यावर मोठ्या प्रमाणात आहार घेण्यात येतो. मात्र त्यासाठी रात्री अनेकांना काय खावे असा देखील प्रश्न पडतो. रात्री जेवण हे किरकोळ असावे की पोटभर हा प्रश्न असतो. 

याबाबत सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट अँड डायटिस्ट ऋतुजा दिवेकर हिने सांगितले की, आपण लहानपणापासून जो आहार घेत आहोत, तोच आहार आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे आपल्या शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. रात्रीच्या जेवणात ही सूप किंवा सॅलेड न खाता वरणभात नेहमीच फायदायचा ठरतो. 

मात्र वजन नियंत्रणात राहण्यासाठी काहीजण फक्त सॅलड खाण्याकडे भर देतात. मात्र रात्रीच्या जेवणात वरणभात खाल्ल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरते, असं देखील ऋतुजा हिने सांगितलं आहे. भातामधील जीवनसत्वे आणि डाळीतील कर्बोदके भूक शांत करण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो हाच आहार योग्य असल्याचे देखील ती सांगते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News