‘आई कुठे काय करते'?; कळेल आईचं महत्त्व...!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 December 2019
  • अरुंधती देशमुखची. इतर कोण्या आईप्रमाणेच ती गेले 25 वर्षे संसाराचा गाडा सांभाळत आहे.
  • मुलांचं संगोपन, सांभाळ, घरातल्या इतर सदस्यांची, सासू-सासरे काळजी आणि नवऱ्याच्या कामाची वेळ हे सर्व ती काटेकोरपणे प्रेमाने सांभाळते आहे.

मुंबई : सध्या वेगवेगळा विषय घेऊन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांमधून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न होत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अविभाज्य भाग असणाऱ्या आईबाबत लेखनात आलेलं आपण पाहतो. मात्र मालिकेच्या माध्यमातून आईविषयी सांगणारे कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका आईची कहाणी घेऊन स्टार प्रवाह वाहिने ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घेऊन येणार आहे. 

 

ऑफिसमध्ये 9-9 शिफ्ट करत नसली तरी दिवस रात्र ती घरातल्या कामात व्यस्त असते. तिच्या या कामांचा हिशोब करणं जवळपास अशक्यच आहे. त्याची परतफेड करणंही कठीण पण कौतुक करणंही आपण विसरुन जातो. अशाच प्रत्येक घरातल्या आईचं महत्त्व पटवून देणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून सायंकाळी 7.30 वाजता सुरु होत आहे. 

या मालिकेतली आईची मुख्य भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या साकारत आहेत. मालिकेची कथा आहे अरुंधती देशमुखची. इतर कोण्या आईप्रमाणेच ती गेले 25 वर्षे संसाराचा गाडा सांभाळत आहे. मुलांचं संगोपन, सांभाळ, घरातल्या इतर सदस्यांची, सासू-सासरे काळजी आणि नवऱ्याच्या कामाची वेळ हे सर्व ती काटेकोरपणे प्रेमाने सांभाळते आहे.  पण, हे सर्व करुनही तीला 'आई कुठे काय करते?' असा सवाल केला जातो. स्वत:चं अस्तित्व विसरून अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या आईच्या संघर्षाचा उलघडा या मालिकेतून होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News