मराठी जनतेच्या टिव्हीवर दक्षिणात्य चित्रपटांचा बडगा का?

महेश खेडेकर
Saturday, 2 February 2019

नमस्कार, यिनबझ हा खूप छान प्रकल्प आहे; पण ही तरुणाई आणि हा समाज कधी एकत्र येईल? आपले प्रश्न कोण पुढे मांडणार, त्यावर तोडगा कोण काढणार, आपले प्रश्न कोण ऐकणार? कारण आपणच या सिस्टीम चे गुलाम झालो आहोत. आपल्या घरच्या tv वर ९०% त्याहूनही जास्तच म्हणा दक्षिण भारतीय सिनेमे २४ तास अगदी दिवसभर चालू असतात. लक्षात घ्या कुठे तुमच्या आमच्या राहत्या मुंबईत, महाराष्ट्र राज्यात, मी जेंव्हा ही टिव्ही सुरू करतो तेंव्हा मनोरंजन चे सर्व चॅनेल पार संपेपर्यंत दक्षिण भारतीय सिनेमे प्रत्येक चॅनेलवर झळकत असतात.

मला चॅनेल्स बदलताना असं वाटू लागतं की, मी महाराष्ट्रात राहतोय की साऊथला? बरं किती टक्के मुंबईकर, महाराष्ट्रीय लोकांनां आवडतात हे सिनेमे? किती लोक बघतात आवडीने? पार जबरजस्तीने सर्रास हे चालू आहे. गेले काही 3 ते 4 वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्र कोणाचा?

या महाराष्ट्रात आणि मुंबईत कन्नड, उर्दू, मद्रासी, तेलगू लोकं किती टक्के आणि मराठी किती? मग तुम्ही मराठी सिनेमे सर्रास डावलता, मराठी चित्रपटांसाठी या मुंबईत चित्रपटगृह मिळतच नाहीत, यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. या मुंबईत महाराष्ट्रात राहणारा मराठी किंवा हिंदी असुदे, इतका बेअक्कल आहे की, या डी२एच, कॅबल वाल्यांना मासिक शुल्क देतो, पण ते देताना एकही प्रश नाही विचारत की, चॅनेलवर हिंदी सिनेमे का नाही वारंवार दक्षिण भारतीय सिनेमेच का? 

बरं ह्यांच्या सर्वांच्या मागे आहे तरी कोण, गुपित तरी काय? एवढी लाचारी का या ब्रॉडकास्ट मीडियावर आली आहे? की मुंबईत आणि महाराष्ट्रात राहून, इथेच कमवून, इथेच खाऊन तुम्हाला पोट भरण्यासाठी आणि चॅनेल चालवण्यासाठी नुसतं २४तास साऊथ इंडियन चित्रपट दाखवायची गरज पडते?

मराठी माणूस हळू हळू या मुंबईतून हद्दपार होत चाललाय, या झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिकरणामुळे ही मुंबई आणि महाराष्ट्र काय ह्यांच्या बापाची जहागीर आहे? का मूठभर हे तेलगू, कन्नड, मद्रासी आणि अक्खा दिवस टीव्हीवर नुसता ते मारछाट सिनेमे, चला! दक्षिण भारतात तिकडच्या चॅनेल्स वर 1 हफ्ता, महिना सतत हिंदी, बॉलीवूड अन्य सिनेमे चालवून दाखवा, घेतील ते खपवून?
मग आपणच का सगळं खपवून घेतो आपल्याच राज्यात, शहरात घरात? जागे व्हा मित्रानो! आणि एकमताने आवाज उठवा, जमलं तर बहिष्कार टाका, आंदोलन करा, जर सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला हे सिनेमे वारंवार नकोत आम्ही केबल शुल्क आम्ही भरणार नाही हा सूर उठवायला हवा, तरच ह्यांची अक्कल ठिकाणावर येईल ते कुठे राहतात, कुठे आपली पोट भरतात आणि काय दाखवतात?
त्यांना त्यांची जागा दाखवून द्या 
आपल्यातलाच एक सामान्य माणूस

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News