व्हॉट अ गाय ! चक्क गाईची बाईकवरुन सवारी,

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

सध्या सोशल मीडियावर अशाच एका पाकिस्तानी झुगाड करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय...नेमका काय आहे जुगाड  वाचा.​

सोशल मीडियावर हीट होण्यासाठी लोकं काय करतील त्याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका पाकिस्तानी झुगाड करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय...नेमका काय आहे जुगाड  वाचा.

सोशल मीडियाच्या या जमान्यात कधी काय व्हायरल होईल याची शाश्वती नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क गाईला पुढे बसवून दुचाकी चालवत असल्याचं दिसतेय. हा व्हिडीओ आपला शेजारील देश पाकिस्तानमधला आहे. 

या व्हिडीओतली व्यक्ती अत्यंत आरामशीरपणे गाईला पुढे बसवून दुचाकी चालवताना दिसतोय...
कुत्रा, मांजर यांना दुचाकीवरुन प्रवास करताना आपण पाहिलं असेल; पण एखादी व्यक्ती चक्क गाईला घेऊन प्रवास करताना आजपर्यंत पाहिलं नसेल. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या शेजारुन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने हा गंमतशीर प्रकार मोबाइलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

सेकंदाच्या या व्हिडीओत शूट करणारी व्यक्ती हा पाकिस्तानी जुगाड आहे असं कौतुक करताना ऐकू येतंय. महत्त्वाचं म्हणजे दुचाकीवरुन जाताना गायदेखील अत्यंत शांत बसलेली दिसते. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा मुक्या जीवावर अत्याचार असल्याचं म्हटलंय.

काहींनी अपघाताची भितीही व्यक्त केली आहे. तर एका युजरने हा माणूस खरा राक्षस आहे असं म्हटलंय. सोशल मीडियात चमकोगीरीसाठी या व्यक्तीने केलेला प्रयत्न त्याच्या जीवावरही बेतू शकला असता त्यामुळे तुम्ही असा स्टंट करु नका.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News