‘ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’ मालिकेमधून जनजागृती....

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Tuesday, 9 April 2019

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’ मालिका गेली कित्येक वर्षं टीआरपीच्या शर्यतीत सरस आहे. हिना खान आणि करण मेहराला खरी प्रसिद्धी मिळाली ती या मालिकेमुळेच.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’ मालिका गेली कित्येक वर्षं टीआरपीच्या शर्यतीत सरस आहे. हिना खान आणि करण मेहराला खरी प्रसिद्धी मिळाली ती या मालिकेमुळेच.

ही मालिका फक्त फॅमिली ड्रामाच नव्हे; तर प्रेक्षकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवण्यासही पुढे सरसावली आहे. मालिकेच्या कथेनुसार महिलांचा त्यांच्या कुटुंबातच होणारा लैंगिक छळ यावर भाष्य करण्यात येणार आहे

. राजन शाही हे या मालिकेचे निर्माते आहेत. ते म्हणतात, ‘भारतातील आज सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे महिलांचं लैंगिक शोषण. या मालिकेमधून महिलांचा हा महत्त्वपूर्ण प्रश्‍न प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांनी लैंगिक शोषणाबाबत खुलेपणाने बोलावं हा आमचा यामागचा महत्त्वाचा हेतू आहे.’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News