सूटसोबत काय ‘सूट' करेल? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 March 2019

आजकाल पार्टी किंवा बिझनेस मीटिंग किंवा अगदी लग्न समारंभासारख्या ठिकाणी कित्येक जण सूट परिधान करताना दिसतात. पण या सूटबरोबर घड्याळ कसं घालावं, टी शर्ट कसा घालावा? टाय कोणत्या रंगाचा असावा, असे प्रश्‍न पडलेले असतात. या गोष्टींची आपल्याला माहिती नसते. अशाच काही गोष्टींची आपण आज माहिती करून घेणार आहोत. 

आजकाल पार्टी किंवा बिझनेस मीटिंग किंवा अगदी लग्न समारंभासारख्या ठिकाणी कित्येक जण सूट परिधान करताना दिसतात. पण या सूटबरोबर घड्याळ कसं घालावं, टी शर्ट कसा घालावा? टाय कोणत्या रंगाचा असावा, असे प्रश्‍न पडलेले असतात. या गोष्टींची आपल्याला माहिती नसते. अशाच काही गोष्टींची आपण आज माहिती करून घेणार आहोत. 

  • सूट निवडताना शक्‍यतो काळा, नेव्ही ब्लू किंवा ग्रे रंगांची निवड करावी. कोणीतरी घालतं म्हणून तुम्ही गुलाबी वगैरे रंगांचे सूट घालू नका. रंगीत सूट तुम्ही एक दोन वेळाच घालू शकता. कायमस्वरूपी सूट घालायचे असतील तर काळा, निळा किंवा ग्रे रंगालाच पसंती द्यावी. 
  • टाय घालताना तुमच्या सूटच्या पॉकेट स्क्वेअरला शोभेल असाच निवडा. 
  • स्टिचेस केलेले टॅग काढून टाकावेत. कित्येक वेळा खिशाजवळ किंवा बटणाजवळ टॅग स्टिच केलेले असतात. सर्वप्रथम ते काढून टाकावेत. कधी कधी लोगो किंवा टॅगदेखील लावलेले असतात. सर्वप्रथम ते काढून टाकावेत. 
  • सूटसोबत कधीही स्मार्ट वॉच परिधान करू नये. तुमचं नेहमीचं घड्याळचं शोभून दिसतं. 
  • सूट परिधान करणं म्हणजे तुम्ही तुमचा लूक क्‍लासी बनवता. म्हणूनच हातातल्या जास्तीच्या अंगठ्या किंवा ब्रेसलेट काढून टाकावे. जास्तीत जास्त एक किंवा दोन अंगठ्या चालू शकतात. 
  • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फिटींगला व्यवस्थित असावा. तो तसा नसेल तर तुम्ही शिंप्याकडून किंवा ज्या ठिकाणाहून घेतला असेल तिथल्या टेलरकडून तो व्यवस्थित शिवून घ्यावा. 
  • तुमचं वॉलेटही सूटला साजेसं असंच म्हणजेच लेदरचं आणि अतिशय कॉम्पॅक्‍ट असं असावं. खिशात सहज जाणारं आणि दिसायलाही डिसेंट लूक असणारं वॉलेट वापरावं. 
  • तुम्ही उभे असाल तर पहिली दोन बटणचं लावावीत आणि खालचं बटण कधीही लावू नये. तसंच तुम्ही बसला असाल तर बटणं लावूच नयेत. ती ओपनच ठेवावीत. 
  • प्रत्येक वेळेला सूटसोबत टाय वापरलाच पाहिजे असं काही नाही. बदल म्हणून बंद गळ्याचे टीशर्ट तुम्ही घालू शकता. व्ही गळ्याचे किंवा कॉलर असलेले टीशर्ट घालू नये.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News