प्लेटलेट्स म्हणजे काय? आणि प्लेटलेट्स कमी झाल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019

यातून ह्दयरोग आणि स्ट्रोकसारखे आजार होतात. प्लेटलेट्स हे आपल्या शरीरातील मोठ्या हाडांत असणाऱ्या रक्तप्रवाहात मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. साधारणत: यांच आयुष्य 5 ते 9 दिवसाचं असतं.

प्लेटलेट्स म्हणजे काय?
प्लेटलेट्स अर्थातच तंतुकणिका हा रक्तातील एक महत्त्वाचा घटक होय. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’करतात. 

तसेच रक्तात मुख्यत: तीन प्रकारच्या पेशी - पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि प्लेटलेट्स असतात. या तीन पेशींपैकी रक्तामध्ये प्लेटलेट्सची संख्या जास्त असते. सर्वसाधारणपणे मानवी शरीरात दीड लाख ते साडेचार लाख इतक्या संख्येत प्लेटलेट्स आढळतात. आणि प्लेटलेट्स वाढल्यास साकळलेल्या रक्ताचा थेंब होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

यातून ह्दयरोग आणि स्ट्रोकसारखे आजार होतात. प्लेटलेट्स हे आपल्या शरीरातील मोठ्या हाडांत असणाऱ्या रक्तप्रवाहात मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. साधारणत: यांच आयुष्य 5 ते 9 दिवसाचं असतं. प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन आपल्या शरीराला कोठेही इजा झाली आणि त्यातून रक्तप्रवाह सुरु झाला की जखम झालेल्या ठिकाणी रक्तस्त्राव खंडित करण्याचे काम करतात. 

प्लेटलेट्स कमी झाल्यास पुढील गोष्टी लक्षात ठेवा: 
1. लसूण खाणे टाळावे
2. दगदग होईल किंवा अधिक श्रमाचे व्यायाम होईल अशी कामे करु नये
3. दात घासताना हिरड्यांना ब्रश लागणार नाही याची काळजी घ्यावी
4. बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी
5.शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी

तसेच गुळवेल, आवळा, पपई, भोपळा, पालक, नारळ पाणी आणि बीट यांचे नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी या आहारांचे सेवन जरुर करावे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News