देश तरुणांचा पण त्यांच्या गुणवत्तेचं काय ? : के. आर. अणेकर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

मुलुंड येथील व्ही. बी. देशपांडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. के. आर. अणेकर यांनी देशातील तरुणांची प्रगती खुंटवण्याचे काम प्रामुख्याने मोबाईल करत असल्याचे म्हटले आहे.

नेरळ : भारताला जगातील सर्वांत तरुण देश बोलले जाते; पण या देशातील तरुणांच्या गुणवत्तेचे काय? असा प्रश्‍न उपस्थित करत मुंबईमधील मुलुंड येथील व्ही. बी. देशपांडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. के. आर. अणेकर यांनी देशातील तरुणांची प्रगती खुंटवण्याचे काम प्रामुख्याने मोबाईल करत असल्याचे म्हटले आहे. नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयात शिक्षणातील बदल आणि त्यातील जडणघडण या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठाच्या आदेशानुसार या कार्यशाळेचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. के. आर. अणेकर यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेसाठी कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरुण देवरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. उद्‌घाटन सोहळ्याला विद्या मंदिर मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत जाधव, डॉ. मिलिंद पोतदार आणि प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे उपस्थित होते. बदलते शैक्षणिक धोरण आणि त्यात होणारे बदल, जडणघडण याबाबत प्राध्यापक वर्गाला जागरूक करण्यासाठी आणि त्या धोरणाबद्दल अधिक सजग बनण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रयत्न करत आहे. त्यानिमित्त प्रा. स्नेहल देशपांडे आणि प्रा. सागर मोहिते यांनी पुढाकार घेतला होता. ग्रामीण भागातील संस्थांनी संख्यात्मक नाहीतर गुणात्मक विद्यार्थी घडवायला हवेत, अशी अपेक्षाही डॉ. अणेकर यांनी व्यक्त केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News