यावर्षी शालेय आणि महाविद्यालय प्रवेशाचं काय? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया घालवता येणार नाही,,शाळा सुरू झाल्या नाहीत. तरीही शिक्षण सुरूच राहील. शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महाराष्ट्र -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus) अद्याप कमी झालेला नाही. याचा  शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यावर नव्या शैक्षणिक वर्षाचं काय, प्रवेश होणार कसे याची उत्तर आणि यासंबंधीचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केला.

कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया घालवता येणार नाही,,शाळा सुरू झाल्या नाहीत. तरीही शिक्षण सुरूच राहील. शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणारी प्रणाली विकसित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News