वेस्ट इंडीजचा 'हा' खेळाडू बॉलीवुड अभिनेत्रीच्या प्रेमात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि बॉलीवुड अभिनेत्री श्रिया सरन यांच्या रिलेशिनशिपची जोरदार चर्चा

क्रिकेटर आणि चंगेरी दुनिया यांच एक नातुट नात आहे. क्रिकेटच्या दुनियेत अधिराज्य गाजवणारे अनेक खेळाडू बॉलीवुड अभिनेत्रीच्या प्रेमात पडतात. बॉलीवुड आणि हॉलीवु़ड अभिनेत्री हेजल कीच आणि क्रिकेटर युवराज सिंग, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराज कोहली यांचे प्रेम सर्वांनाच माहिती आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि बॉलीवुड अभिनेत्री श्रिया सरन यांच्या रिलेशिनशिपची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. ड्वेन ब्राव्हो हा वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंगकडून आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केली होती. ड्वेन ब्राव्हो यांचे भारतीय खेळाडूंशी मित्रत्वाचे संबंध आहेत. श्रिया सरन साऊथ चित्रपटाची अभिनेत्री आहे, तिने बॉलीवुडच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘दृश्यम’ चित्रपटात केलेल्या भुमिकेमुळे श्रियाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून ती प्रकाश झेतात आली. 

अभिनेत्री श्रिया सरन ही ड्वेन ब्राव्हो यांना डेट करताना दिसली. एका हॉटेमध्ये दोघे जेवन करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. दोघे काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याती जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या नात्याविषयी दोघांनाही प्रश्न विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. 'ड्वेन ब्राव्हो खुप चांगला क्रिकेटर आहे, त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल तो ओळखला जातो त्यामुळे मी पण त्याची फॅन आहे असे अभिनेत्री श्रिया सरन यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News