नीट, जेईई परीक्षांचा अभ्यासक्रम कमी होणार?    

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रेवशासकरिता घेतली जाणारी नीट, जेईई परीक्षेत ९ वी ते १२ वी अभ्यासक्रामाचे अनेक प्रश्न विचाले जातात. मात्र, सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला. त्यामुळे नीट आणि जेईई परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन सुरु केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आली. तरी दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय केव्हा सुरु होतील हे सांगता येत नाही. शाळा, महाविद्यालय सुरु झाले तर विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)  नववी, दहावी, अकरावी आणि बारावी वर्गाचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. 

नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमावर वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE main) प्रवेशाच्या परीक्षा अवलंबून असतात, सीबीएसई प्रमाणे नीट आणि जेईई परीक्षांचा अभ्यासक्रम कमी करावा अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्लासेस मालकांनी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडे केली.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रेवशाकरिता घेतली जाणारी नीट, जेईई परीक्षेत ९ वी ते १२ वी अभ्यासक्रामाचे अनेक प्रश्न विचाले जातात. मात्र, सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला. त्यामुळे नीट आणि जेईई परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नीट आणि जेईई परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करावा अशी मागणी विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेस मालाकांनी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडे केली. त्याच बरोबर अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. अभ्यासक्रम कमी करण्याचा टेंड्र बुधवारी ट्विटरवर सुरु होता. नीट, जेईईचा अभ्यासक्रम नॅशनल टेस्टींग एजन्सी लवकरच कमी करेल अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांनी समजमाध्यमांवर व्यक्त केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News