सक्सेस पार्टीत सुशांत सिंगची झाली मुलाखत; चेतन भगला सुशांतने दिले 'खास' टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020

सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी सुशांत सोबत झालेली भेट एका मुलाखतीमध्ये सांगितली, सुशांतने बॅलिवुडची सुरुवात 'काय पो छे' या हिंदी चित्रपटापासून केली केली. हा चित्रपट चेतन भगतच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' पुस्तकावर आधारित आहे. 

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी देखील आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण झाली नाही. या काळात अनेक कलाकारांनी सुशांत सोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी सुशांत सोबत झालेली भेट एका मुलाखतीमध्ये सांगितली, सुशांतने बॅलिवुडची सुरुवात 'काय पो छे' या हिंदी चित्रपटापासून केली केली. हा चित्रपट चेतन भगतच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' पुस्तकावर आधारित आहे. 

सुशांतच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये चेतन भगत आणि सुशांत सिंग यांची मुलाखत झाली. चेतन भगतने फिट राहण्यासाठी सुशांत सिंग यांच्याकडून काही टिप्स मागितल्या होत्या, 'चित्रपटात दिलेले फिटनेस वर्कआउट करण्यासाठी सुशांतने सांगितले. सुशांत आपल्या  फिटनेस वर्कआउटसाठी कठोर परीश्रम घेत होता, तशी मेहनत घेणे शक्य होणार नाही' म्हणून मी वर्कआऊटाचा मार्ग सोडून दिला' अशी माहिती चेतन भगतने दिली.

चेतन भगत आणि सुशांत सिंग यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी 'इंजीनियरिंग एंट्रन्स एक्झाम' एकदाच दिली होती, परीक्षेत दोघेही चांगल्या गुणांनी पास झाले आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. अभियांत्रिकीनंतर चेतन भगतने एमबीए करण्याचा मार्ग स्वीकारला तर सुशांत सिंग यांनी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला असताना चंदेरी दुनियेत प्रवेश केला. टेलिव्हिजन मालिकेस सक्सेस झाल्यानंतर सुशांतने बॅलिवुडमध्ये प्रवेश केला. एक यशस्वी कलाकार म्हणून सुशांत उदयास आला. अभियांत्रिकी सोडून सुशांतने बॉलीवूडचा मार्ग स्वीकारला आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला ही खूप मोठी गोष्ट आहे' असे चेतन भगतने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News