गल्लीबॉय अनुजचे मानखुर्दमध्ये  जंगी स्वागत

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019
  • टान्झानियातील बॉक्‍सिंग स्पर्धेचे अजिंक्‍यपद; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

मानखुर्द - मानखुर्दच्या झोपडपट्टीतील अनुजकुमार सिंग टांझानियातील ‘युनिव्हर्सल बॉक्‍सिंग ऑर्गनायझेशन’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून बुधवारी (ता. १६) परतला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यामुळे अनुजकुमार सिंगची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत नागरिकांनी त्याचे जंगी स्वागत केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावून अनुजकुमार बुधवारी परतणार असल्यामुळे मानखुर्दच्या ज्योतिर्लिंग नगरमध्ये सणासुदीसारखे वातावरण होते. 

त्याची भेट घेण्यासाठी तसेच त्याचे मिळवलेले पदक पाहण्यासाठी मित्र मंडळी सकाळीच विमानतळावर गेली होती. मानखुर्द स्थानकासमोरील भुयारी मार्गाजवळ त्याच्या स्वागतासाठी मानखुर्दकर ढोल- ताशांसह हजर होते. अनुजकुमार पोहोचताच चार चाकीच्या छतावर बसवून त्याची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्याला खांद्यावर उचलून घेत थेट त्याच्या गल्लीपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर महिलांनी त्याला ओवाळले व मिठाई वाटून सर्व उपस्थितांचे तोंड गोड केले. स्वागतासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी व आ बालवृद्ध हजर होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News