वजन कमी करायचय; या आहेत टिप्स 

अमृता मिश्रा- पाटील  
Tuesday, 23 April 2019

आपले स्वतःचे वजन किती पाहिजे ते निश्चित करा. किती दिवसांमध्ये ते कमी करायचे आहे. ते साधरणता: प्रत्येक आठवड्यात एक किलो कमी करायचे किंवा दोन किलो कमी करायचे ते ठरवा. हे ठरवलेले जे टार्गेट आहे ते आपल्या परिवाराबरोबर मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा. म्हणजे आपण ते प्रामाणिकपणे सुरू करतो. 

स्वतःचे स्वास्थ्य नीट करण्यासाठी आपण स्मार्ट गोल ठरवणार आहोत. स्मार्ट गोल कसा असला पाहिजे? 

  • विशिष्ट 
  • मोजण्यायोग्य 
  • प्राप्त करण्यासारखे 
  • यथार्थवादी 
  • वेळेची मर्यादा असणारा 

सगळ्यांनी एक कागद आणि पेन घ्या, आणि त्या वर लिहा तुमचे सगळ्यात जास्त वजन किती होते, कधी होते, केव्हा होते आणि तेव्हा तुम्हाला कसे वाटायचे? दुसऱ्या पानावर लिहा तुमचे सगळ्यात कमी वजन किती होते, कधी होते, केव्हा होते आणि तेव्हा तुम्हाला कसे वाटायचे?
 
आता वजन काय असले पाहिजे? पाच फूट जर उंची असेल तर आपले वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो असायला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक इंचाला दोन ते तीन किलोपर्यंत त्यात अजून वाढू शकतो. उदाहरणार्थ पाच फूट तीन इंच वजन असेल तर पन्नास ते पंचावन्न वजन असले पाहिजे. या पद्धतीने आपले स्वतःचे वजन किती असले पाहिजे ते टार्गेट करा. किती दिवसांमध्ये ते हवे आहे ते साधरणत: प्रत्येक आठवड्यात एक किलो कमी करायचे किंवा दोन किलो कमी करायचे ते ठरवा. हे ठरवलेले जे टार्गेट आहे ते आपल्या परिवाराबरोबर मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा. म्हणजे आपण ते प्रामाणिकपणे सुरू करतो. 

वजन कमी करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले सकाळच्या वेळेचा कसा वापर करतो. नियमितपणे सकाळी उठल्यावर व्यायाम, भरपूर पाणी पिणे, योगासने करणे. आपल्या सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे करणे. चांगला नाश्‍ता घ्या. उठल्यानंतर 2 तासांच्या आत. न्याहारीमध्ये चांगले प्रथिने, कर्बोदक, भाज्या आणि फळे समाविष्ट करणे आवश्‍यक आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री कमी खाणे आणि लवकर खाणे. याचा अर्थ भुकेले राहायचे? असा नाही. याचा अर्थ असा की दिवसभर वेळेत आणि व्यवस्थित खायचे म्हणजे रात्री जास्त भूक राहात नाही. जर आपण व्यवस्थित नियोजित आहार घेतला आणि सकाळी लवकर व्यायाम केला, तर आपोआप रात्रीच्या जेवणात आपण कमी खातो. दिवसभरात दोन वेगळी फळे, भरपूर भाज्या, सलाड आणि बाकी थोड्या प्रमाणात फुलके, दलिया असे खायचे. 

आपण ज्या प्रमाणात कॅलरीज घेतो, त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्या वापरल्या गेल्या पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. गोड पदार्थांमध्ये जास्त कॅलरी असतात. जर गोड खायची इच्छा झाली तर एक ग्लास पाणी पिऊन बघा, गोड खाण्याची इच्छा जाते. आपण स्वतःसाठी बिनसाखरेचा केक अशा पद्धतीने तयार करू शकतो. अशा भरपूर गोष्टी बनवता येतात; पण उदाहरण म्हणून ही एक रेसिपी सांगते.

चॉकलेट पावडर, प्रोटीन पावडर किंवा नाचणी, लोणी, अंडी, केळी किंवा खजूर, बेकिंग पावडर हे सगळे प्रमाणात एकत्र करून याचा केक बनवणे. अत्यंत रुचकर लागतो. अशा पद्धतीने आपण स्वतःच स्वतःसाठी एक टाइम टेबल बनवून आपली तब्येत छान बनवू शकतो. 

संसाराचा हा गाडा सारून सारून, 
स्वतःचेच नियोजन आखून आखून, 
दिवसभर पुरेसे जेवण करून करून, 
आपलेच वजन आपण दाखवू कमी करून.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News