भन्नाटच! लग्नपत्रिका आहे की 7/12 उतारा, एकदा बघाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

पुण्यातील प्रवीण इंगळे यांची ही लग्नपत्रिका असून, ते जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांनी पत्रिकेला असे वेगळे रूप दिले आहे. ही पत्रिका समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली असून, ती चर्चेची ठरली आहे. 

पुणे : मुलगा जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो म्हणून वराकडील मंडळींनी चक्क लग्नपत्रिका 7/12 उताऱ्यासारखी केली आहे. विशेष म्हणजे लग्नाची तारीखही 7/12 आहे. 

पुण्यातील प्रवीण इंगळे यांची ही लग्नपत्रिका असून, ते जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांनी पत्रिकेला असे वेगळे रूप दिले आहे. ही पत्रिका सोशलमीडियावर व्हायरल झाली असून, ती चर्चेची ठरली आहे. 

लग्नाची वेळ, खाते क्रमांक, कुळाचे नाव, असे सगळे या पत्रिकेत आहे. 7/12 उताऱ्यावर जसा शासकीय शिक्का असतो, त्याच आकाराचा येथे शिक्का असून, त्यावर इंगळे परिवार असे लिहिले आहे. 

काही दिवसांपूर्वी अशीच एक पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मुलगा मंत्रालयात नोकरीला होता. त्यामुळे त्याने शासन आदेशानुसार पत्रिका तयार केली होती. शासन आदेश जसा असतो, तशा स्वरूपात पत्रिका छापली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News