'लग्ना'नंतरचा मेकअप

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ टीम)
Tuesday, 26 March 2019

वयाची तिशी ओलांडल्यानंतर आपल्या शरीरात आणि सौंदर्यातही खूप बदल होत असतात. यानंतर हलक्‍या सुरकुत्याही चेहऱ्यावर येतात. त्यामुळे तिशीनंतर चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

वयाची तिशी ओलांडल्यानंतर आपल्या शरीरात आणि सौंदर्यातही खूप बदल होत असतात. यानंतर हलक्‍या सुरकुत्याही चेहऱ्यावर येतात. त्यामुळे तिशीनंतर चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

तिशीनंतर आयब्रोज कर्व्ह ठेवल्याने चेहरा अधिक सुंदर दिसतो. त्यामुळे सौंदर्यात भर पाडणाऱ्या या आयब्रोजची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या चेहऱ्यावर हलक्‍या सुरकुत्या यायला सुरवात होते, यासाठी चेहऱ्यावर फाउंडेशन लावणे गरजेचे आहे.

चेहऱ्याच्या रंगाशी जुळेल अशा रंगाचे फाउंडेशन वापरावे. यावर फेस पावडर लावावी, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पडत असलेले बारीक डागही दिसणार नाहीत. यासाठी ब्लशर देखील उत्तम काम करतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News