आम्ही हात दिला; तुम्ही साथ द्या: दिग्दर्शक संचित यादव यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 28 June 2020

लॉकडाऊन काळात ज्यांच्यापर्यंत जीवनोपयोगी वस्तू पोहोचत नव्हत्या अशा गरजूंपर्यंत वस्तू पोहचवण्याचे काम दोन महिन्यांपासून संचित आणि पूर्णिमा यादव करत आहेत.

मुंबई: लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. उमापमारीची वेळ आली. अशा गरजूंना अभिनेता, दिग्दर्शक संचित यादव आणि अभिनेत्री पूर्णिमा यादव यांनी मदतीचा हात दिला. लॉकडाऊन काळात ज्यांच्यापर्यंत जीवनोपयोगी वस्तू पोहोचत नव्हत्या अशा गरजूंपर्यंत वस्तू पोहचवण्याचे काम दोन महिन्यांपासून संचित आणि पूर्णिमा यादव करत आहेत. गरजूंना मदत करण्याचे सेवा कार्य त्यांनी हाती घेतले. 

ग्रामीण भागातील गाव, वाड्यांवर जाऊन त्यांनी परिस्थिती पाहिली.  अनेक कुटुंबात जीवनोपयोगी वस्तूंचा तुटवडा आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यास सुरवात केली. आत्तापर्यंत त्यांनी 500 पेक्षा अधिक कुटुंबांना घरपोच फुड पॅकेट पोहोचले आहेत. गरजूंना मदत पोहचण्यासाठी संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवणार यादव यांचा मानस आहे. 

एक फूड पॅकेट बनवण्यासाठी 600 रुपये खर्च येतो. ज्यात कांदे, बटाटे, मीठ, तेल, तिखट मसाला, गरम मसाला, दोनप्रकरची डाळ, चण्याचे पीठ, हळद, साखर, चहा पावडर, माचीस अशा जीवनोपयोगी वस्तू असतात. यादव यांनी सुरु केलेल्या सेवा कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि नमस्ते फाऊंडेशन मदत करत आहे. मात्र नागरिकांनी या सेवा कार्यात जशी जमेल तशी मदत करावी असे आवाहन संचित आणि पूर्णिमा यादव यांनी केले. मदतीसाठी संपर्क-  09870467860, 08928053052

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News