काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सेवाभावी विचारसरणी ; त्यांच्यासोबत काम करणे सकारात्मक 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 17 January 2020
  • काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेतृत्व करणाऱ्या मंडळींमध्ये सेवाभावी विचारसरणी हि अगदी कटाक्षाने जाणवते.
  • महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता या दोन्ही पक्षांसोबत महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये योगदान देणे सहज शक्य आहे . 

मुंबई : महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे.महाराष्टाची राजकीय संस्कृती संपूर्ण देशाला परिचित आहे . हा महाराष्ट्र स्व यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. ह्याच राज्यात बाळासाहेब ठाकरेंसारखे कट्टर हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे नेते होऊन गेले. ह्याच महाराष्ट्राच्या मातीत शरद पवारांसारखे लोकनेते जन्मले.मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून पुढे आलेले विलासराव दगडोजीराव देशमुख यांनी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले.  वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेली हि दिग्गज मंडळी वेगवेगळ्या विचारसरणीची होती तरीसुद्धा त्यांनी एकमेकांविषयी कधीही व्यक्तिगत आकस बाळगला नाही.

काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेतृत्व करणाऱ्या मंडळींमध्ये सेवाभावी विचारसरणी हि अगदी कटाक्षाने जाणवते. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता या दोन्ही पक्षांसोबत महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये योगदान देणे सहज शक्य आहे . त्यामुळे आम्ही या दोन्ही पक्षांसोबत काम करण्यासाठी प्रचंड आशावादी आहोत अशा आशयाचे मत शिवसेनेचे नेते,युवासेनाप्रमुख आणि नवनियुक्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. तसेच आमचे पक्ष वेगळे असले तरीही आमचे  सगळ्यांशी कौटुंबिक संबंध आहेत असेही  त्यांनी नमूद केले.

 
संगमनेर  येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडले. मराठी चित्रपटसृष्टीतील गायक अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रातील तरुण आमदारांना यावेळी चांगलेच बोलते केले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तरुण आमदार व्यासपीठावर उपस्थित होते. यामध्ये आदित्य ठाकरे,रोहित पवार,अदिती तटकरे, ऋतुराज पाटील,जिशान सिद्दीकी यांचा समावेश होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News