मराठमोळ्या शिलेदारांकडून वजीर सुळका सर...!!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 January 2020
  • ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे.  
  • याच परिसरात असलेला २५० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे.  याच परिसरात असलेला २५० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी कात्बाव (चाफ्याचा पाडा) गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जराजारी पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते अशी चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची २५० फुटाची ९० अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते. 

महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरचा असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर SHILEDAR ADVENTURE INDIA च्या धडाकेबाज गिर्यारोहकांनी  दिनांक ०५ जानेवारी २०२० रोजी शिलेदार संस्थेचे संस्थापक शिलेदार सागर विजय नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वजीर सुळका सर करून गिर्यारोहण क्षेत्रात एक यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे. या मोहिमेत शिलेदार संस्थेचे लीड क्लायम्बर विशाल मोरे यांनी मोहिमेची धुरा सांभाळली तर त्यांना दिपक विसे, शुभम महाडिक यांनी मोलाची साथ दिली आणि वजीर सुळक्यावर प्राणप्रिय भारतीय राष्ट्रधज फडकावला. यानंतर त्यांच्यापाठोपाठ शिलेदार संस्थेचे राकेश यादव, अक्षय इंदोरे, अनिकेत जाधव, सागर नलवडे सह्यगिरी संस्थेचे दिपक, कुसुम यांनीही वजीर सुळका सर केला. या मोहिमेत शिलेदार संस्थेचे मार्गदर्शक सुंदरदादा चाळके, स्वनिल कदम, आदित्य नाखवा, अक्षय शेलार यांनी बेस कॅम्प वर महत्वाची जबाबदारी पार पाडली. 

नववर्षाच्या अवघ्या पाच दिवसात सह्याद्रीतील तीन अवघड सुळके सर

मागील दहा वर्ष सह्याद्रीत अविरत भटकंती करणारे मूळचे कोल्हापूर येथील शिलेदार सागर विजय नलवडे यांनी सहा महिन्यापूर्वी त्यांच्या वाढदिवसाला ०१ जुलै २०१९ रोजी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड येथे जाऊन SHILEDAR ADVENTURE INDIA या गिर्यारोहण संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी आजवर बरीच भटकंती केली असून बरच कातळकडे सुळके सर केले आहेत. महाराष्ट्रातील अवघड मानला जाणारा लिंगाणा सुळका त्यांनी ४०/४५ वेळा सर केला असून लिंगाणा सुळका विनसाहित्य अवघ्या १६ मिनिट ४० सेकंदात सर करण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांनी रशिया येथील माऊंट एलब्रुस हे  हिमशिखर सर केले आहे.

त्यांच्या मागर्दर्शनाखाली शिलेदार संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. २०२० या नववर्षाच्या सुरवातीलाच धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या पाच दिवसात तीन सुळके सर केले आहेत. ०१ जानेवारी २०२० रोजी २९६९  फूट उंचीचा लिंगाणा सुळका पुणे येथील अवघ्या ०४ वर्ष वय असलेल्या सह्याद्री महेश भुजबळ या चिमुकलीसह सर केला. ०३ जानेवारी २०२० रोजी ढाक बहिरी येथील २०० फूट उंचीचा कळकराय सुळका सर केला तर ०५ जानेवारी २०२० रोजी शहापूर ठाणे येथील २५० फूट उंचीचा वजीर सुळका सर केला आहे, याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News