'या' 31 चेंडूमध्येच श्रीलंका हारली होती

यिनबझ टीम
Saturday, 11 January 2020

फलंदाजांनंतर आश्चर्यकारक गोलंदाजांमुळे भारताने दुसर्‍या टी -20 मध्ये श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 2-0 ने जिंकली. 201 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंका 123 धावा करुन ऑलआऊट झाली. पण मालिकेच्या विजयाची खरी कहाणी भारताने स्वतः सहाव्या षटकात लिहिलेली होती.

सहाव्या षटकातील पहिला चेंडू, म्हणजेच श्रीलंकेच्या डावाच्या 31 व्या चेंडूवर भारतीय संघाने श्रिलंकेला 4 खेळाडू तंबूत पाठवून दनका दिला होता. २०१ धावांचं लक्ष्य पुर्ण करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाने 26 धावांच्या मोबदल्यात4 गडी गमावले. 

गुनाथीलाका आणि फर्नांडो डाव सुरू करण्यासाठी मैदानात आले. जगातील नंबर वन गोलंदाज बुमराहला गोलंदाजीची जबाबदारी कर्णधार कोहलीने दिली. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बुमराहला मिड-ऑन एरियामध्ये गुणनाथला झेलबाद करण्यासाठी यश आले आणि तिथेच श्रिलंकेचा संघ ढासळला. पण बुमराहनंतरच्या पुढच्या षटकात ठाकूरने श्रीलंकेच्या आशांना आणखी एक मोठा धक्का दिला. ठाकूरने फर्नांडिसला झेलबाद केले.

26 च्या स्कोअरवर 4 विकेट गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ संपूर्ण सामन्यात पुन्हा सावरला नाही. त्यामुळे भारताचा टर्निंग पॉईंट हा  31 चेंडूमध्येच ठरला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News