फिल्टरच्या वेस्टेज पाण्यातुन युवकाने जगवली ३२ झाडे

जालिदंर धांडे 
Wednesday, 5 June 2019
  • पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र असने आवश्यक 
  • बिड जिल्ह्यात फक्त २.४० टक्के वृक्ष क्षेत्र
  • जिल्ह्यातील दुष्काळ हटवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पाच ते दहा झाडे लावण्याची गरज
  • यंदा वन विभागाच्या वतिने जिल्ह्यात सव्वा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे

बीड: दिवसेंदिवस जिल्ह्यातील दुष्काळाचे चित्र भयान होत आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळेच शहरातील एका व्यक्तीने पुढाकार घेतला असुन फिल्टरचे वेस्टेज पाणी झाडांना देऊन ३२ झाडे जगवले आहे. शहरातील या युवकाचा आदर्श सर्वांनी घेऊन, प्रत्येकांने किमान पाच ते दहा झाडे लावण्यास, जिल्ह्यातील दुष्काळा नाहीसा होण्यास मदत मिळु शकले.

पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र असने आवश्यक असते. पण बिड जिल्ह्यात फक्त २.४० टक्के वृक्ष क्षेत्र आहे. जिल्ह्यातील वने कमी होत असल्यामुळे दुष्काळ पडत आहे. यामुळे यंदा वन विभागाच्या वतिने जिल्ह्यात सव्वा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळ हटवण्यासाठी शहरातील विनोद हरिशचंद्र चव्हाण या युवकांने फिल्टरचे वेस्टेच पाणी पाण्याच्या टाकीच साठवुन ३२ फळांची व फुलांची झाडे जगवली आहेत. यामध्ये आंबा, नारळ, डाळींब, चिक्कू, जांबुळ, सीताफ़ळ, लिम्बु, कड़ीपत्ता, रामफ़ळ, गुलाब, मोगरा, चांदीपाट, शेवगा, सह इतर फुलांची झाडे  लावुन त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले आहे. चव्हाण या युवकांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. 

"मानवी जीवन व पशु पक्षी यांचे जीवन हे पाऊस आणि झाडे यांच्यावर अवलंबुन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने यंदाच्या मान्सुन मध्ये किमान एक झाड लावुन त्यांचे संगोपन करावे. यामुळे जिल्ह्यातील वृक्षांचे क्षेत्र वाढण्यास मदत मिळेल व जिल्ह्यातील सततचा दुष्काळा कमी होईल" 
- विनोद हरिशचंद्र चव्हाण, युवक, बीड

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News