पाण्यावर धावणारी बाईक लवकरच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 July 2020

आता लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची देखील गर्दी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आपल्या वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणात दिसून येते.

वॉशिंग्टन :- आता लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची देखील गर्दी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आपल्या वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणात दिसून येते. अनेक जणांना या वाहतुकोडींच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुम्हाला अशा समस्येतून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग मिळला तर काही फायदा होऊ शकतो. आता अशात पाण्यावर चालणारी बाईक चालवण्याची संधी तुम्हाला मिळाली तर किती मज्जा येईल, याची कल्पना केली तरच खूप मस्त वाटते पण हीच कल्पना आता लवकरच सत्यात उतरणार आहे. न्यूझीलंडच्या एका कंपनीने चक्क पाण्यावर चालणारीच नव्हे तर भरधाव वेगाने धावणारी ‘इलेक्ट्रॉनिक्स बाईक’ विकसित केली आहे. ही बाईक अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ मध्ये सादर करण्यात आली आहे. 

न्यूझीलंडमधील स्टार्टअप कंपनी ‘मॅंटास ५’ या कंपनीने ‘हैड्रोफॉलिअर एक्स-१’ असे नाव असलेली आणि पाण्यावर चालणारी बाईक तयार केली आहे. ही बाईक पाण्यावरून ताशी १९ कि.मी. वेगाने धावते. या बाईकला चाकांऐवजी ‘हैड्रोफॉईल’ ची सोय आहे. याशिवाय बाईकमधील प्रोफेलरमुळे पाण्यावर तरंगण्यास मदत मिळते. तसेच ही बाईक अत्यंत हलकी असून ती पाण्याबाहेर सहजासहजी आरामात उचलून नेता येणे शक्य आहे. पाण्यावर चालणाऱ्या या बाईकमध्ये ४६० व्हॅटची इलेक्ट्रिक मोटार बसविण्यात आली आहे. यामुळे पाण्यात वेगाने बाईक चालवण्यास मदत मिळते. याशिवाय या मोटरची ऊर्जा आणि वेगही वाढवता येतो. ब्रिटनमध्ये सध्या या बाईकची किंमत ५७९० पाऊंड म्हणजे ५.३७ लाख इतकी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News