पॉर्न पाहण्याचं व्यसन असेल तर सावधान

हर्षल भदाणे पाटिल
Monday, 28 January 2019

जगभरातील लोक अन्न आणि भाषेपेक्षा वेगळे आहेत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यावर जगातील प्रत्येक समाज एक मत आहे.पॉर्ऩ हे त्या गोष्टींपैकीच एक आहे, त्याचा वापर व्यापक होत असला तरी तो प्रत्येक समाजाकडून वाईट मानला जाणार विषय आहे. पॉर्न फिल्म पाहणे कधी कधी धोकादायक ठरू शकतं. सतत पॉर्न फिल्म पाहण्याचा नेमका काय दुष्परिणाम आहे, हे पाहुयात..

जगभरातील लोक अन्न आणि भाषेपेक्षा वेगळे आहेत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यावर जगातील प्रत्येक समाज एक मत आहे.पॉर्ऩ हे त्या गोष्टींपैकीच एक आहे, त्याचा वापर व्यापक होत असला तरी तो प्रत्येक समाजाकडून वाईट मानला जाणार विषय आहे. पॉर्न फिल्म पाहणे कधी कधी धोकादायक ठरू शकतं. सतत पॉर्न फिल्म पाहण्याचा नेमका काय दुष्परिणाम आहे, हे पाहुयात..

तरुण, अल्पवयीन मुले पॉर्न चित्रपटांच्या जाळ्यात
आजकाल लहान मुलांचे पॉर्न चित्रपट पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढत असून आईवडिलांच्या नजरा चुकवून मुले चित्रपट पाहतात. हजारो तरुण तरुणीही असे चित्रपट पाहणे पसंत करीत असल्याने पॉर्न चित्रपट म्हणजे एकप्रकारची फॅशन होत चालली असून लैंगिक अपराधांना त्यामुळे वाढीव ऊर्जा मिळत आहे.

पॉर्नमुळे वाढतात लैंगिक अत्याचार?
एक रिपोर्ट सांगतो की, पॉर्नमुळे वैवाहिक संबंध बिघडण्याचे, जोडीदाराला धोका देण्याचे प्रमाण ३०० टक्यांनी वाढले आहे.पॉर्नमुळे लैंगिक अत्याचाराच्या कृतींमधे वाढ होते.  यामुळे  इतर छोटेमोठे गुन्हेही घडतात. त्यावेळी या  गुन्हेगारांवर अनुशासन होत नाही, मग त्यांची हिम्मत वाढते.

पॉर्नमुळे आनंदाची भावना कमी होऊ शकते
२०१४  मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, पॉर्न पाहण्यामुळे मेंदूमध्ये आनंदाची भावना कमी होऊ शकते, ज्यामुळे स्ट्रायटम कमी होऊ शकतं. पॉर्न पाहण्यामुळे बऱ्याचदा शारीरिक संबधाना हानिकारक  जबाबदार धरले जाते.

पॉर्नचं व्यसन लागु शकते का?
केंब्रिज विद्यापीठाच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अश्लील पाहण्याची सवय अंमली पदार्थाच्या नशे सारखी आहे. दोन्ही गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मेंदू बराचसा प्रतिसाद देतो.

असे अॅप्स डाऊनलोड करणे धोकादायक 
पॉर्न फिल्म पाहताना त्यासोबत काही अॅप्स आपोआप डाऊनलोड होतात. त्यामुळे फोनमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये  व्हायरस शिरू शकतो. पॉर्न साइटला भेट दिल्यावरही असे अॅप्स डाऊनलोड होतात. याचा उपाय म्हणजे अॅप्स आपोआप डाऊनलोड न होण्यासाठी ऑटोमॅटीक डाऊनलोड हे ऑप्शन बंद केले पाहिजे. हे ऑप्शन बंद केले नाही तर तुमच्या फोनमध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये  व्हायरस घुसू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News