कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020

कोरोनाचा संसर्ज टाळण्यासाठी हात मिळवुन अभिवादन करण्याऐवजी पाय मिळवुन अभिवादन करण्याची अनोखी शक्कल तरुणाने लढवली आहे.

कोरोना संसर्गजन्य रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. सध्यातरी कोरोना आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क, सॉनिटायझरचा वापर केला जात आहे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ज टाळण्यासाठी हात मिळवुन अभिवादन करण्याऐवजी पाय मिळवुन अभिवादन करण्याची अनोखी शक्कल तरुणाने लढवली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

हात मिळवुन अभिवादन केल्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे, हा संसर्ज टाळण्यासाठी विदेशात तरुणांनी हात मिळवण्याऐवजी पाय मिळवुन अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. एका व्हिडीओ मध्ये दोन तरुण भेटण्यासाठी एकत्र येतात, तोंडावर मास्क लवुन एक तरुण कार मधून उतरतो, तेवढ्यात त्याचा दुसरा मित्र भेटण्यासाठी जवळ जातो, अभिवादन करण्यासाठी हात पुढे करतो, मात्र गाडीतून उतरलेला तरुण हात पुढे न करता पाय पुढे करतो आणि दोन्ही मित्र
एकमेकांना पाय लावुन अभिवादन करतात. अभिवादनाची ही नविन शक्कल कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तरुणाने लढवली आहे.

 
भारतातही कोरोना व्हायरसचे काही पॉझीटीवर रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनग्रस्त रुग्णांची सख्या वाढतचं चाचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, जीम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच गर्दी टाळण्यासाठी जमाबंदीचाआदेश लागू करण्यात आले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News