पुण्याची धुळवट रिमिक्स, सायलंट पार्टीचा कल्ला

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ टीम)
Wednesday, 20 March 2019

पुणे - शहरात नाइट लाइफ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात हा प्रकार तुलनेने जास्त आढळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सायलेंट पार्टी हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रकारामध्ये कानाला हेडफोन लावून संगीतासह पार्टीचा आनंद घेता येते. यामुळे सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात  करण्यात येत आहे. 

पुणे - शहरात नाइट लाइफ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात हा प्रकार तुलनेने जास्त आढळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सायलेंट पार्टी हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रकारामध्ये कानाला हेडफोन लावून संगीतासह पार्टीचा आनंद घेता येते. यामुळे सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात  करण्यात येत आहे. 

शहरात गतवर्षी कोरेगाव पार्क परिसरातील एका बारमध्ये प्रथमच सायलेंट पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हेडफोनद्वारे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनेलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो. या पार्टीला प्रतिसाद मिळाल्यानंतर इतरत्रही अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. कोथरूड, हडपसर, बाणेर, हिंजवडी अशा विविध ठिकाणी अशा पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. सध्या  होळीच्या मुहूर्तावर या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे पार्टीचा आस्वादही घेता येतो आणि प्रदूषणही होत नाही.पबमालक संदीप अग्रवाल म्हणाले, की पुण्यात पहिल्यांदा आम्ही गेल्या डिसेंबर महिन्यात अशा पार्टीचे आयोजन केले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्यामुळे  यंदा दोन-तीन वेळा अशा पार्टीचे आयोजन केले.

ग्राहक गाण्यांचा आणि संगीताचा आस्वाद घेतात. तसेच ध्वनिप्रदूषण होत नसल्यामुळे त्यांना ही संकल्पना आवडते.

सायलेंट पार्टीची क्रेझ सध्या तरुणांमध्ये वाढत आहे. एकाच वेळी विविध संगीताचा आस्वाद घेता येत असल्यामुळे पार्टीमध्ये वेगळी रंगत येते. हॉलिवूड, बॉलिवूड गाण्यांचा एकत्र आस्वाद  या पार्टीमुळे घेता येतो. तसेच आपल्या इच्छेनुसार संगीत किंवा गाणे निवडण्याचा पर्यायही मिळत आहे. ध्वनिप्रदूषण होत नसल्याने इतरांना या पार्टीचा त्रासही होत नाही. त्यामुळे हा नवीन ट्रेंड तरुणाईला आवडू लागला आहे.
- आशिष सुर्वे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News