worldcup2019 म्हटलं होतं ना ? भारतच आहे वर्ल्टकपचा किंग मेकर..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

लंडन :  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करतानाच माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी पुढील प्रवासात ऑस्ट्रेलिया संघाला भारताचाच प्रमुख अडथळा असेल, असे मत व्यक्त केले आहे. 

लंडन :  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करतानाच माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी पुढील प्रवासात ऑस्ट्रेलिया संघाला भारताचाच प्रमुख अडथळा असेल, असे मत व्यक्त केले आहे. 

भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने गेले दहा एकदिवसीय सामने जिंकले आहेत. भारताने देखील विश्‍वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सुरवात केली आहे. पण, त्यांचा विजय सफाईदार नव्हता असे बॉर्डर यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, "भारताची गोलंदाजी चांगली झाली. पण, ते फलंदाजी तितक्‍या सहज करू शकले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर धावांचे पुरेसे पाठबळ नव्हते. रोहित शर्माने नंतर एकहाती विजय मिळवून दिला.'' 

वेस्ट इंडीज संघाची कामगिरी सर्वांचे लक्ष लागून रहावे अशीच आहे. त्यांची तयारी चांगली आहे. महत्त्वाचे म्हणजे ते खूपच त्वेषाने खेळत आहेत. 
- ऍलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार 

भारताविरुद्धच्या लढतीनंतर ऑस्ट्रेलियाला आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा मिळेल. बॉर्डर म्हणाले, "भारतीय संघाचे आव्हानदेखील तसे सुरक्षित नाही. आघाडीचे तीन फलंदाजी आणि बुमराची गोलंदाजी वगळल्यास त्यांचा संघ अन्य संघांसारखाच वाटतो. अर्थात, भारताच्या दर्जेदार संघाविरुद्धच्या लढतीनंतर ऑस्ट्रेलियाला विश्‍वकरंडक स्पर्धेत आपण कुठे आहोत आणि कुठपर्यंत जाणार आहोत याचा अंदाज येईल.'' 

सर्वोत्तम कामगिरी केल्याशिवाय तुम्हाला जिंकता येत नाही आणि त्यासाठी भारताविरुद्धची लढत ही कसोटीची असेल असे सांगून बॉर्डर म्हणाले, "विश्‍वकरंडकाच्या प्रवासात भारतच ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. स्पर्धेत सुरवातीला बांगलादेश आणि पाकिस्तान संघांनी नोंदविलेल्या सनसनाटी विजयामुळे कुठल्याही संघाचे आव्हान सुरक्षितच नाही.'' 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News