वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला महाराजाकडून मारहाण; हरिपाठ करत नव्हता म्हणून...

यिनबझ टीम
Friday, 21 February 2020

आळंदीच्या वारकरी विद्यार्थ्यांवर होत आहेत अत्याचार

आळंदी - वारकरी वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी मावळ तालुक्यातून आलेल्या अकरा वर्षांच्या वारकरी विद्यार्थ्याला गुरू महाराजांकडून बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार आळंदीमध्ये घडला आहे. जखमी विद्यार्थ्यांला खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली भगवान पोहणे या महाराजाला आळंदी पोलिसांनी परभणी येथील जिंतूर तालुक्यातील ओझर गावातून ताब्यात घेतले आहे. ओम राजू चौधरी असे जखमी विद्यार्थ्याने नाव आहे.

घराची हालाखीची परिस्थिती, त्यातच घरचा कारभार सांभाळणाऱ्या वडीलांचे छत्र हरपलं म्हणून आई कविता राजू चौधरी यांनी आपल्या मुलाला आळंदीला शिकण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मागील एक वर्षापासून माऊली ज्ञानराज प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्थेत राजू शिक्षण घेत होता. दोन दिवसांपुर्वी राजूला उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला असल्याचे सांगण्यासाठी शाळेतुन फोन आला होता, ते जाणून घेण्यासाठी राजूच्या मामांनी शाळेला भेट दिली. त्यावेळेस राजू बेशुध्द असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ त्याला आनंद हॉस्पिटल, तळेगाव येथे दाखल करण्यात आले. तीन दिवसांनी शुध्दीवर आल्यानंतर राजूने घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला.

गेल्या काही दिवसांपासून राजू हरिपाठ आणि शाळेतून दिलेला अभ्यास करत नव्हता म्हणून आरोपी महाराज भगवान पोहणे याने राजूचे हात पाय बांधून पायावर तसेच छातीवर मारहाण केली, राजूच्या अंगावर त्याप्रकारचे वळदेखील दिसत आहेत. 

ओम राजू चौधरी असे जखमी विद्यार्थ्याने नाव असून या मुलाला आठ दिवसांपासून मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे खासगी रूग्णालायत दाखल केले होते. त्यानंतर पिंपरीतील खासगी रूग्णायात अतिदक्षता विभागात राजूवर उपचार सुरू असून ओमची तब्येत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News