अर्थशास्त्रात करियर करायचंय; जाणून घ्या! भविष्यातील संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

सध्या अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. कारण जगभरात इकॉनॉमिक्स विषयाला मागणी आहे. अर्थशास्त्राच्या शिक्षण देणाऱ्या नामवंत संस्था, नोकरीची संधी, वेतन याविषयी आम्ही सांगणार आहोत. 

विद्यार्थ्यांपुढे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, त्यामधून चांगला विकल्प निवडणे भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आवड आहे अशा विषयांची निवड करिअरसाठी करावी. सध्या अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. कारण जगभरात इकॉनॉमिक्स विषयाला मागणी आहे. अर्थशास्त्राच्या शिक्षण देणाऱ्या नामवंत संस्था, नोकरीची संधी, वेतन याविषयी आम्ही सांगणार आहोत. 

अर्थशास्त्राच्या विविध पदव्या

विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रात पदवी प्राप्त करण्यासाठी अनेक विकल्प आहेत. बारावीनंतर बॅचलर ऑफ आर्ट, बॅचलर ऑफ सायन्स दोन्ही शाखेत अर्थशास्त्र विषय घेऊन पदवी मिळविता येते. त्याचबरोबर बॅचलर ऑफ आर्ट इन बिझनेस इकॉनोमिक्स, बॅचलर ऑफ अप्लायड इकॉनोमिक्स, आणि बॅचलर ऑफ आर्ट ऑनर्स विषयात पदवी घेता येते. त्यानंतर पदव्युत्तर पदवी, एम. फिल आणि पी. एचडी करता येते.

नोकरीची संधी 

भारतीय लोक सेवा आयोग (यूपीएससी) द्वारे इंडियन इकॉनोमिक सर्विस (IES) परीक्षा घेतली जाते, परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना गट 'अ' पदाची सरकारी नोकरी मिळते. देश- विदेशातील खाजगी आणि सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर नॅशनल काऊन्सिल ऑफ इकॉनॉमिक्स रिसर्च इन्टिट्यूट, इन्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ अशा नामवंत संस्थेत नोकरी मशू शकते.

किती मिळणार वेतन 

इकॉनॉमिक्समध्ये करिअर केल्यानंतर सुरुवातीला चार ते पाच लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळू शकते, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनुभवावर आणि कौशल्यावर पॅकेजची वाढ होते. त्यामुळे नेहमी अपडेट राहणे इकॉनॉमिक्ससाठी गरजेचे आहे.

कोणते कौशल्य आवश्यक

इकॉनॉमिक्समध्ये करियर करताना काही कौशल्यांची आवश्यकता असते. क्रिटिकल थिंकींग, कठीण समस्या क्षणात सोडवण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी वेगळी रणनीती आखणे, दुसऱ्यांना सहज समजले अशा पद्धतीने कामात सुसूत्रता असावी. इकॉनॉमिक्सना नेहमी लिहण्याची आवश्यकता असते. त्यासाठी रायटिंग स्किल असणे गरजेचे आहे. इकॉनॉमिक्स विषायवर दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि काही पुस्तके प्रकाशीत होत असतात. त्यासाठी लिहण्याची गरज भासते.

देशातील टॉप महाविद्यालय 

अर्थशास्त्रामध्ये करिअर करण्यासाठी चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेणे आवश्यक आहे. देशातील टॉप महाविद्यालयांची माहिती पुढील प्रमाणे: दिल्ली येथील श्रीराम कॉलेज आणि मिरांडा हाऊस, मुंबई येथील सेंट जेविअर्स महाविद्यालय, मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेज आणि चेन्नई विद्यापीठ या अर्थसास्त्राच्या प्रमुख शिक्षण संस्था आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News