वजन कमी करायचंय? रात्री झोपण्यापूर्वी एवढंच करा..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020
  • आहार योग्य करण्यासोबतच तो योग्यवेळी करणे शरीराच्या हिताचे असते.
  • तसे न झाल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी वाढू लागते.

बदलत्या जीवनशैलीमुळे आज खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये मोठा फरक पडलेला असतो. मात्र याचा थेट फटका आपल्या आरोग्याला पडतो. यामुळे अनेकांचे लठ्ठ होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. वजन वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनियमित आहार..!  आहार योग्य करण्यासोबतच तो योग्यवेळी करणे शरीराच्या हिताचे असते. तसे न झाल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी वाढू लागते.

शरीरातील अतिरिक्त वजन घटविण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. त्यामध्ये डायटिंग, जिम, रनिंग असे अनेक पद्धती वापरल्या जातात. काही सवयी बदलल्या तर वजन नक्की नियंत्रणात राहू शकते. रात्री झोपण्यापूर्वी काही पेय शरीरातील पचनशक्ती जलद करतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

दालचिनी चहा 
आहाराच्या वेळा पाळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र त्यासोबत आपण घेतलेला आहार पचतो की नाही, हे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरतं. यामध्ये दालचिनीचा चहा अत्यंत गुणकारी ठरतो. शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी हा चहा महत्त्वाचा ठरतो. गरम पाण्यात दालचिनी किंवा दालचिनीची पूड टाकून २० मिनिटे भिजत ठेवावे. मात्र यामध्ये साखरेचा वापर करू नये. मधाचा वापर करून या चहाचे सेवन करता येईल. रात्री झोपण्याआधी या चहाचे सेवन केल्यास नक्की फायदा होईल. 

मेथीच्या दाण्यांचे पाणी  
वजन कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा देखील फायदा होतो. मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्या माध्यमातून अतिरिक्त चरबी कमी होते. मेथीच्या दाण्यांनी पित्त देखील कमी होते. मेथीचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी गाळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. मात्र अतिरिक्त मेथीच्या दाण्यांचा वापर शरीरासाठी घातक ठरू शकतो. 

ग्रीन टी 
सर्वांचा ऑल टाइम फेव्हरेट असा ग्रीन टी आज प्रचलित झाला आहे. ग्रीन टीच्या माध्यमातून मेटाबॉलिजम वाढण्यास मदत मिळते. यामुळे आरोग्य स्थिर राहते. त्यानुसार फ्रेश वाटते. कोणत्याही वेळेस हा चहा पिणे फायदेशीर ठरतो. त्याचसोबत अनेक फेल्व्हर्समध्ये उपलब्ध असल्याने अनेकजण ग्रीन टी ला पसंती देतात. या चहाच्या सेवनामुळे देखील वजन कमी होण्यास मदत मिळते.  

 

कॅमोमाइल चहा
ग्रीन टी प्रमाणे कॅमोमाइल चहाचा वापर देखील वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो. या चहामध्ये ‘फ्लुइड रिटेन्शन’ आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी, सूज कमी करण्यासाठी मदत मिळते. तसेच या चहातील विविध द्रव्ये शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकते. बाजारात या चहाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. या चहाची पाने गरम पाण्यात भिजत ठेवून रात्री झोपण्यापूर्वी पिणे फायदेशीर ठरते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News