आयटीत राहायचंय? वाचा आयटीच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत

सुजाता साळवी
Sunday, 11 October 2020

तो इंटरव्ह्युवर चांगला नव्हता... मालकाच्या वशिलाने कोणालातरी आधीच घ्यायचं ठरलं असणार त्यांचं... म्हणून तर माझ्यासारख्या चांगल्या वेल क्वाॅलिफाईड कन्डिडेटला त्यांनी रिजेक्ट केलं असणार... इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेचच किंवा काही दिवसांनी आपल्यापैकी अनेकांनी ही रिअॅक्शन जाहीरपणे दिली असेल किंवा मनातल्या मनात बोलून दाखविली असेल.. पण खरंच असं असतं का? कोणत्याही कंपनीमध्ये आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा ते आपल्या स्किलसेटकडे बघतात की वशिल्याकडे कि लूक्सकडे?

आयटीत राहायचंय? वाचा 'आयटी' च्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत

- सुजाता साळवी

लेखिका या ईव्हिओएक्स टेक कंपनीच्या सीओओ आहेत

तो इंटरव्ह्युवर चांगला नव्हता... मालकाच्या वशिलाने कोणालातरी आधीच घ्यायचं ठरलं असणार त्यांचं... म्हणून तर माझ्यासारख्या चांगल्या वेल क्वाॅलिफाईड कन्डिडेटला त्यांनी रिजेक्ट केलं असणार... इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेचच किंवा काही दिवसांनी आपल्यापैकी अनेकांनी ही रिअॅक्शन जाहीरपणे दिली असेल किंवा मनातल्या मनात बोलून दाखविली असेल.. पण खरंच असं असतं का? कोणत्याही कंपनीमध्ये आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा ते आपल्या स्किलसेटकडे बघतात की वशिल्याकडे कि लूक्सकडे?

काही कंपन्यांमध्ये काही व्यक्तींकडून कदाचित असा बायस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सगळीकडेच या निकषांवर इंटरव्ह्यू घेतले जातात असं नक्कीच नाही. मग अशा बहुतांश प्रसंगांमध्ये आपण कमी पडलो की कंपनीला आपल्यातले गुण दिसले नाहीत यापैकी नेमकं काय घडत असेल?

विशेषतः सातत्याने बदलणाऱ्या इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी (आयटी) क्षेत्रात काय घडते? मी स्वतः आयटीमध्ये बॅचलर डिग्री घेतल्यानंतर साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ओळखली जाऊ लागले. पण खरं तर टेक्निकल पर्सन म्हणून मला माझी ओळख टिकवून ठेवण्यात खूप संघर्ष करावा लागत होता. मोठमोठाले कोड्स लिहिणे आणि ते डिप्लाॅय करणं ही माझी ताकद नव्हती पण ते प्रोफेशनली आणि कार्यक्षमपणे डिप्लाॅय झाले आहेत की नाही हे तपासण्याचं काम मला आवडत असे. त्यामुळे मग मी क्यूए म्हणून करिअर करायचं ठरविलं. तरीही त्यामध्ये माझा स्ट्रगल सुरूच होता.

तुम्हाला वाटेल की मी माझ्या फ्यूचर करिअरच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करत नव्हते किंवा मी अनप्रोफेशनल होते पण ते खरं नाही. माझ्या शिक्षणाचा, क्वाॅलिफिकेशनला जस्टिफाय करण्याचं प्रेशर माझ्यावर होतंच, पण माझा कल हा बॅकएन्ड किंवा संस्थेच्या मॅनेजमेंटच्या बाजूला अधिक होता. डिलिव्हरी टीमऐवजी प्रोडक्ट टीमचा भाग होण्याला माझी पसंती अधिक होती. माझं स्वतःचं उदाहरण मी एवढ्यासाठी दिले कारण तुमच्यासमोर फक्त कॅन्डिडेटची बाजू न मांडता एम्प्लाॅयरच्या दृष्टीने कॅन्डिडेटकडे कसे पाहिले जाते ते मांडायचं आहे.

सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आपल्या सीव्हीमध्ये अनेक गोष्टी लिहित असतो. आपला ड्रीम जाॅब मिळविण्यापासून ते एखाद्या आयटी कंपनींमध्ये स्टेक्स मिळविण्यापर्यंत आणि अंतिमतः एखाद्या आयटी कंपनीचा सीईओ किंवा मालक होणं हे शाॅर्ट-टर्म आणि लाँग-टर्म माईलस्टोन्स म्हणून आपल्या सीव्हीमध्ये आपण उल्लेख केलेला असू शकतो. पण प्रश्न असा आहे की हे सर्व साध्य करण्यासाठी त्यादृष्टीने काम कसं करायचं. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट केलं जातं त्यावेळी काही बोललं जात नाही पण जर रिजेक्ट केलं तर मात्र इंचरव्ह्यूवरच्या हेतूबाबत आपण शंका उपस्थित करतो. पण एम्प्लाॅयरच्या दृष्टीने चांगला सुयोग्य कॅन्डिडेट मिळविणे एवढंच महत्त्वाचं असतं. नोकरी मिळवताना आपण फक्त आपला स्वतःचा, एकट्यापुरता विचार करत असतो पण एम्प्लाॅयरला व्यापक स्वरुपात विचार करावा लागतो. संस्थेच्या दृष्टीने विचार करत असताना तुमच्या स्किलसेटचा उपयोग कंपनीला कसा होऊ शकतो किंवा होणार नाही याचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो.

त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना त्या क्षेत्रातील जाॅब ट्रेंड्स काय आहेत, इंडस्ट्रीच्या अपेक्षा काय आहेत आणि सद्यस्थितीत तुम्ही कसं सामावून घेतले जाऊ शकता याचा विचार तुम्ही केला पाहिजे. प्लेसमेंट ड्राईव्ह आणि इव्हेन्ट्सचा काळ आता गेला आहे. प्रत्येक जाॅबच्या संधीमध्ये अमुलाग्र बदल घडत आहेत. अतिशय वेगाने बदलणाऱ्या या क्षेत्रात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हालाही तितक्याच झपाट्याने बदलावे लागेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News